नविन नांदेड| श्रीराम नवमी जन्मोत्सव निमित्ताने हडको येथील श्रीराम मंदिर येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती तर राम किर्तन, महाप्रसाद व सिडको येथील राम मंदिर येथे महाआरती करण्यात आली, यावेळी महिला,पुरुष ,युवक ,जेष्ठ नागरिक यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती,तर परिसरातील अनेक मंदीरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
श्रीराम नवमी जन्मोत्सव निमित्ताने १० एप्रिल रोजी सकाळ पासूनच रामनवमी जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम निमित्ताने मंदिर देवस्थान समितीच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,तर सकाळी बारा वाजता महाआरती व राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला, धार्मिक पध्दतीने पाळणा बांधण्यात येऊन महिलांच्या ऊपसिथीत राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
सिडको येथील राम मंदिर येथे नितीन जलकोटे, माधव घाणेकर ,प्रदीप आडसकर, रामराव निरपणे पराग पंचभाई ज्ञानेश्वर संगणवार ,बबन शिंदे राजन जोजरे गुरू सुशील कुलकर्णी, आशिष धानोरकर यांनी परिश्रम घेतले तर प्रा .जामकर महाराज यांचे राम जन्माचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. वासवी व वनिता क्लब सिडको च्या वतीने ऊपसिथीत भाविकांना सरबत वाटप करण्यात आले. हडको राम मंदिर येथिल विश्वस्थ उदय पाध्ये, संजय घोगरे ,संजय शिंदे शिवनराव शिरसाट ,संगप्पा नमोसे ,नारायण गुट्टे, कांचन जोशी ,निर्मला भंडारी, विनायक जोशी ,प्रभाकर तमेवार ,वसंत कुलकर्णी, विजय केसकर ,बालाजी राहटकर, केरबा क्षीरसागर, अँड.उद्धवराव पोळ, यांनी परिश्रम घेतले. देवहुती भालचंद्र जोशी गाजपुरकर सेलु यांच्ये राम जन्मोत्सव पर किर्तन व महा आरती नंतर विश्वस्त समितीचा वतीने महाप्रसाद विनायक जोशी यांनी भाविकांना रसनाचे वाटप केले.
राम जन्मोत्सव सोहळा निमित्ताने परिसरातील मंदीरात महाआरती व राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ग्रामीण पोलीस स्टेशन चा वतीने श्रीराम नवमी निमित्ताने पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा अधिकारी, ५३ पोलीस अंमलदार व २३ होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राम जन्मोत्सव सोहळा निमित्ताने मनपा विरोधी पक्षनेते दिपक सिंह रावत, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, सिडको शहर अध्यक्ष गजानन कते, संतोष गुट्टे, मुन्ना शिंदे, मलिकारजुन नमोसे,अनिल पाटील,सुहास पाटील, संजय शिंदे, यांच्यासह अनेकांनी राम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी नोंदविला.