शेतकऱ्यांना बुलेट ट्रेनची नाही तर पक्क्या रस्त्याची खरी गरज - खासदार हेमंत पाटील -NNL


वसमत/हिंगोली|
देशाच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याला दळणवळणासाठी बुलेट ट्रेनची गरज नसून त्यांना शेतमाल बाजारपेठेत  घेऊन जाण्यासाठी पक्या आणि मजबूत रस्त्यांची गरज असल्याने सरकारने यावर भर देऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करावे  असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी वसमत तालुक्यातील किन्होळा -कुरुंदा ते सुकळी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी कुरुंदा येथे केले. या रस्त्यामुळे याभागातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा कायमचा प्रश्न मिटणार आहे असेही ते म्हणाले 

यावेळी व्यासपीठावर तालुका प्रमुख राजू चापके,माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,विधानसभा संघटक संभाजी बेले,सरपंच राजेश पाटील इंगोले ,जि. प. सदस्य माऊली झटे ,जि. प. सदस्य बालाजी जाधव , माजी तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी,किसान सेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र सोळंके,उपतालुका प्रमुख विश्वनाथ दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे, युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती,शहरप्रमुख काशीनाथ भोसले,विधानसभा उपसंघटक पंढरीनाथ क्षीरसागर, सर्कलप्रमुख काशीनाथ दळवी , बापूराव अंभोरे, उद्धव मुळे, आदींची उपस्थिती होती. किन्होळा -कुरुंदा ते सुकळी या रस्त्याची मागील अनेक दिवसापासून मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत होती. रस्त्याअभावी या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतातील पिकवलेला माल बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता .  

परंतु ६ किमी लांबीच्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना पक्या पुलांसह मजबूत रस्ता मिळणार आहे . देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला  खऱ्या अर्थाने सद्यस्थितीला बुलेट ट्रेनची गरज नाही तर पक्या आणि मजबूत रस्त्याची गरज आहे . हेच शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून राज्याचे कर्तव्यदक्ष  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम मातोश्री पाणंद रस्त्याच्या योजना सुरु करून या माध्यमातून २० हजार किमीच्या वर पाणंद रस्त्याचे जाळे उभे केले आहे. शोषणाचा केंद्रबिंदू म्हणून शेतकऱ्यांची सर्वच स्थरातून लुबाडणूक करण्यात येते परंतु महाराष्ट्रातील सरकार हे शेतकरी हिताचे उद्दिष्ट डोळ्यसमोर ठेवून कार्य करत आहे .असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले . ग्रामीण भागात पक्का आणि मजबूत रस्ता दळणवळणाचे  मुख्य साधन आहे. 

या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील  रस्त्यांना नवी झळाळी देण्याचे काम करत आहेत  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आतापर्यंत ७० कोटीच्या वर ७ तालुक्यात काम करण्यात आले असून उर्वरित ४ तालुक्यातील आणखी कामे करण्यात येणार आहेत . कुरुंदा येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाला युवासेना तालुकाप्रमुख देविदास पाटील कऱ्हाळे , चेअरमन बाबुराव शेवाळकर , सरपंच सत्यनारायण बोखारे , चेअरमन माणिक बोखारे , संतोष शेळके ,मारोतराव पवार, माजी सरपंच दत्तराम इंगोले , वामनराव दळवी, संभाजी सिद्धेवार , दीपक इंगोले, गजानन इंगोले राजेंद्र सांगळे चांदू शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी