वरद विनायक - कनकेश्वर महादेवाच्या कलश मिरवणुकीने उत्सवाची झाली सुरुवात -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील बोरी - उमरखेड रस्त्यावर असलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिराच्या कलशारोहनची तयारी पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळची ९ वाजता शहरातील मुख्य रस्त्याने कलशाची भव्य शोभा यात्रा सिरंजनी आणि हिमायतनगर येथील भजनी मंडळ, टाळ मृदंगाच्या वाणीत आणि ढोल ताश्याच्या गजरात काढण्यात आली होती. या शोभायात्रेला महिला मंडळीं डोक्यावर कलश घेऊन सामील झाल्याने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.   



गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील भाविक भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या वरद विनायक आणि कनकेश्वर महादेव मंदिराच्या कलश रोहनचा कार्यक्रम थांबला होत. अखेर या उत्सवाचा मुहूर्त सोमवार दि.२५ एप्रिल रोजी काढण्यात आला असल्याने आज दि.२४ रोजी कलशाची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शहरातील बजरंग चौक, कालिंका, मंदिर, बाजार चौक हनूमान मंदिर, गणेश चौक गणपती मंदिर, लाकडोबा चौक मारोती मंदिर, परमेश्वर मंदिरापासून ते परत पांडवकालीन कनकेश्वर तलावाकडे हि शोभा यात्रा परत आल्यानंतर येथे भाज्यांचा कार्यक्रमाने शोभा यात्रेचा महाप्रसादाने समारोप करण्यात आला.


या शोभायात्रेत शहरांसह ग्रामीण भागातील महिला, पुरुष, भजनी मंडळी आणि बालगोपाल मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. शोभायात्रेत सुरुवातीला डोक्यावर कलश घेऊन महिला मंडळी, त्यामागे भजनी मंडळी टाळमृदंगाच्या गजरात भक्तीगीते गात सहभागी झाले. त्यामागे वरद विनायक आणि कनकेश्वर महादेव मंदिरावर चढविण्यात येणारे कलश अश्या प्रकारे हि शोभा यात्रा काढण्यात आली होती. सदर शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी शांतीलाल श्रीश्रीमाळ, भास्कर चिंतावार, ऋघे सर, दिलीप लोहरेकर पाटील, रामराव पाटील, संगणवार सावकार, राम पाकलवार, गजानन चायल, अनिल भोरे, रामभाऊ सूर्यवंशी, धम्मपलवर सावकार, मुलंगे बाई, मथुराबाई, मादसवार बाई, रामदिनवार बाई, गुंडेवार बाई, पार्डीकर बाई आदींसह शहर परिसरातील महिला मंडळी, युवक आणि भजनी मंडळी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.  दरम्यान उत्सवात कोणतीही बाधा निर्माण होऊ नये म्हणून हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाचा शोभा यात्रेला फटका

हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध मंदिराचा कलशारोहन सोहळा उदयाला दि.२५ रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून मंदिर परिसरात उत्सवाची तयारी करण्यात आली. तसेच शहरात जिकडं-तीकडे प्रचार पोस्टर्स लावून सर्वाना सूचना देण्यात आल्या. शहरात उत्सव असल्याने आज निघणाऱ्या शोभा यात्रेच्या रस्त्याची सफाई आणि स्वच्छता ठेऊन खड्डेमुक्त करण्याचे काम नगरपंचायतीचे आहे. मात्र नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेतील भाविकांना घाणीच्या साम्राज्य दुर्गंधी आणि उखडलेल्या खड्डेमय रस्त्याचा सामना करत मिरवणूक काढावी लागली आहे. यामध्ये सामील झालेल्या महिला मोठ्या अडचणीतून शोभा यात्रा पार पदवी लागल्याने भाविक भक्तांनी नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व दुर्लक्षित कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

सोमवारी कलशारोहन ११ वाजता होणार 
पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या कळस रोहणाचा मुहूर्त दि.२५ सॊमवारी काढण्यात आला असून, बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगावकर आणि संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांच्या उपस्थित होम - हवन, अभिषेक - महापुजेने कलशाची स्थापना केली जाणार आहे. सकाळी शहराच्या मुख्य कमानीपासून दोन्ही महाराजांची शोभा यात्रा ढोल ताश्याच्या गजरात काढण्यात येणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तानी उपस्थित होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समिती आणि वाढोणा वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी