नांदेड| नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी रामदास पाटील सुमठाणकर यांचे वचनस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड द्वारा संचलित राष्ट्रसंत मिशनच्या वतीने आज सकाळी 10 वाजता स्व.शंकररावजी चव्हाण सभागृह येथे भव्य स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक रंजन कोळंबे सर भगीरथ आय ए एस अकॅडमीचे संचालक हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तानाजीराव मुटकुळे हे होते.
कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे आयोजक रामदास पाटील यांचा जिवनपरिचय वैजनाथ स्वामी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक करताना रामदास पाटील सुमठाणकर यांनी उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवल्या पाहिजेत, स्पर्धा परीक्षा स्वरूप काय आहे. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत संधी कशी मिळवावी. सोबतच स्वताचा व्यक्तीमत्व विकास कसा करावा.पाटील यांनी स्वत: 12 वर्ष शासकीय नौकरीत असतानाचे अनेक प्रसंग या वेळी विद्यार्थ्यांना सांगताना आपल्या आयुष्याची वाटचाल कशी असावी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना राजकारणात खर्या अर्थाने उच्च शिक्षीत तरूण पिढीची गरज ओळखून रामदास पाटील सुमठाणकर यांनी शासकीय पदाचा राजीनामा देऊन स्वेच्छा निवृत्ती घेतली व आता पुर्णवेऴ समाज कारण व राजकारणात आमचे सोबत सक्रीय झाले याचा आम्हला आनंद आहे.राज्य व देशाची सेवा आपल्या हातून घडावी या हेतूने प्रचंड मेहनत व जिध्दीने प्रयत्न करा व स्पर्धा परिक्षेची तय्यारी करून अधिकारी व्हा अशा आशयाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रंजन कोळंबे सर यांनी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कशा सोडवल्या पाहिजेत, स्पर्धा परीक्षा स्वरूप काय आहे या विषयी रंजन कोळंबे सर यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ‘एमपीएससी’ व ‘यूपीएससी’ व इतर स्पर्धा परीक्षा या विषयी मार्गदर्शन केले. परीक्षांचा अभ्यास करताना ‘प्लॅन बी’ ची कशी तयारी करावी, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध संधी, अभ्यासाचे नियोजन याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रविण पाटील चिखलीकर,शिवा नरंगले यांची उपस्थिती होती.
उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन करीत विध्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास पाटील सुमठाणकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार अभंगे व सुभाशिष कामेवार यांनी केले.तर आभार प्रदर्शन संदीप केंद्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप केंद्रे,वैजनाथ स्वामी,राम सावळेश्वर,सुभाशिष कामेवार,सोनू कल्याणकर,नितीन टोकलवाड, योगेश पाळेकर,सय्यद मुजीब,सुरज रत्नपारखे,ज्ञानेश्वर सुरनर,किशोर मस्कले,शिवा चिटकुलवार,दिनेश आवडके,स्वप्निल केशेवार,बालाजी भुरे, शिवप्रसाद सोनटक्के,महेश बडूरे,भास्कर डोईबळे,गंगाधर कोमलवार,भुषण पेठकर यांनी परिश्रम घेतले.