पंचनामे करून भरपाई द्यावी आणि खरिपाचे अनुदान वितरित करावे
हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरासह परिसरात रविवारच्या मध्यरात्रीला विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांसह वैरणाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि खरिपातील मंजूर झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान तातडीने देण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
हिमायतनगर तालुका पैनगंगा नदीकाठावर असल्याने अनेक शेतकरी खरिपासह रब्बी हंगामात पिके घेऊन गुजराण करतात. मटार गेल्या काही वर्षांपासून नैसर्गच प्रकोप या तालुक्याला सतावत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे येथील शेतकरी पूर्णतः नागवला गेला आहे. शासनाकडून अनुदान मिळते तेही तुटपुंजे आणि वेळेवर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच क्षणाची कर्जमाफी पासून सुद्धा अनेकजण वंचित असल्याने त्यांना बैन्केकडून कृषी कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यातच भरीत भर म्हणून रविवारच्या मध्यरातरीला अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. खरीप गेला रब्बीतही नुकसान आले आता येणारी खरीप हंगामाच्या तयारी असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी घेतलेल्या उन्हाळी सोयाबीन नुकतेच कापून ठेवले, तर अनेकांचा मका, उन्हाळी ज्वारी, सूर्यफ़ूल यासह आंबा, संत्रा-मोसंबी, डाळिंब यासारख्या फळबागा आणि फुलशेती आहे. मात्र रात्रीच्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे त्या शेतकर्यांना पुन्हा एकदा जोरदार फटका बसला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीसाठी वैरण, इंधन एकत्र करून ठेवले होते. मात्र वादळी वाऱ्याने तेही उडून गेल्याने तालुका परिसरात पाण्याबरोबर आता चार टंचाईचे संकट पुढे येत आहे. या तिहेरी सन्कटात आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मांजर झालेले अनुदान वितरित करून अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे, फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी शेतकरी दिलीप लोहरेकर पाटील, रामभाऊ सूर्यवंशी आदींसह तालुक्यातील शेतकरी, नागरेकातून केली जात आहे.