नायगाव शहरामध्ये गुटखा ,मटखा सट्टेबाजी देशी- विदेशी दारू अवैध विक्री बंद करावी - सोनाली हंबर्डे -NNL


नायगाव, दिगंबर मुदखेडे। 
जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेल्या नायगाव शहरामध्ये  गुटखा ,मतखा ,सट्टेबाजी व अवैधरित्या होत असलेली दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू असल्याची बाब अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष्या मंगल उर्फ सोनाली हंबर्डे याच्या लक्षात येताच सदरचे अवैधरित्या चालणारे व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड याना दिले आहे. 
        
नायगाव हे तालुक्याचे ठिकाण असून याठिकाणी नायगाव शहरासह अनेक गावातील गोर गरीब जनतेचे खुले आम दिवस ढवळ्या मोठ्या प्रमाणात लयलूट होत असून परिणामी अनेकांचे संसार उद्धवस्थ होत आहेत त्यामुळे नायगाव शहरात अवैधरित्या चालू असलेले देशी,विदेशी दारूसह मठखा , गुटखा तात्काळ बंद करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष्या मंगल उर्फ सोनाली हंबर्डे यांनीपोलीस अधीक्षक नांदेड याना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी