महात्मा बसवेश्र्वर यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन


अर्धापूर, निळकंठ मदने।
जगत ज्योती महात्मा बसवेश्र्वर यांच्या अश्र्वारुढ पुतळ्याचे २२ एप्रीलला मोठ्या कार्यक्रमात  पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण आहे,यावेळी महात्मा बसवेश्वर प्रेंमींनी भोग्या प्रमाणावर उपस्थित राहावे आहे आवाहन गोविन्दराव शिंदे व किशोर स्वामी माननी केले आहे.

अर्धापूरातील काॅग्रेस कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,मनपाचे सभापती किशोर स्वामी,जि प चे सभापती संजय बेळगे, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे यांची उपस्थिती होती.

यावेळी गोविंदराव शिंदे म्हणाले कि, महापुरुष एका समाजापुरते नसून,ते सर्वव्यापक आहेत, किशोर स्वामी म्हणाले कि,ना.अशोकराव चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर या़ंच्या ९ हजार स्काअरफुट एवढ्या विशाल जागेत सुंदर पुतळा उभारुन अनावरणाचा  सोहळा  स्वप्नपूर्ती असून,याकामी सर्वपक्षीय सहकार्य झाल्याचे त्यांनी सांगितले.संजय लहानकर म्हणाले की, योग्य पाठपुरावा व ना अशोकराव चव्हाण यांनी दिलेला शब्द यामुळे येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणारा पुतळा असेल असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सचिव निळकंठराव मदने, प्रस्तावित राजेश्वर शेटे व बालाजी गव्हाणे तर आभार छत्रपती कानोडे यांनी मानले.यावेळी बद्रीनाथ पत्रे,पंडीतराव लंगडे, अमोल डोंगरे,व्यंकटी राऊत,डॉ विशाल लंगडे,विलास कापसे, सखाराम क्षीरसागर,गोविंद गोदरे, कैलास भुसे,राजू बारसे,बाळू मरकुंदे, राजाराम पवार,ओमप्रकाश नागलमे,हिरामण लंगडे,शिवराज लंगडे,दिलीप डाडाळे यांच्यासह सर्वपक्षीय उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी