संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन -NNL


नांदेड।
 
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यावतीने संरक्षण क्षमता महोत्सव-2022 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण क्षमता महोत्सव हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला महत्वाचा उपक्रम आहे. 

या उपक्रमाद्वारे जीवाश्म इंधनावरील अपव्यय खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे, जीवाश्म इंधानाच्या ज्वलनातून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूचा प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे संरक्षण करणे.पेट्रोलीयम संरक्षण संघटना, पेट्रोलियम नैसर्गिक वायु मंत्रालय आणि तेल उद्योगाचे समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबंधित राज्य  सरकारच्या सक्रीय सहभागाने विविध उपक्रम हाती घेणे.

दिनांक 30 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये उद्योगासाठी तांत्रिक बैठका, सायक्लोथॉन, वॉकथॉन, शालेय विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा, वादविवाद महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र, वॉल पेंटिंग स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख, लेखन, टिव्ही रेडिओवर टॉक शो, जिंगल्स, या माध्यमातून ऊर्जेच्या वापराबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागृतता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी