लोह्याच्या "सह्याद्री 'ला" मेस्टा" चा बेस्ट स्कुल आवार्ड -NNL


लोहा|
मुंबई येथे  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात इंग्रजी माध्यम शाळा  संस्थाचालक यांचे ( MESTA) मेस्टाच्या राज्यस्तरीय अधिवेशन शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडले याच अधिवेशनातलोह्याच्या सह्याद्री शाळेला बेस्ट स्कुल आवार्ड देऊन गौरविण्यात आले. संस्थापक व कृतिशील शिक्षक सुदर्शन शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इंग्रजी शाळा संचालक यांच्या "मेस्टा ' या संघटनेचे मुंबईत १९ रोजी अधिवेशन पार पडले. यावेळी  राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश (बच्चू) कडू, आमदार सचिन आहेर, प्रहारचे अनिल गावंडे ऑस्ट्रेलियाचे केंद्रीय शिक्षण मंत्री, डेव्हिड प्लॅनेट प्रदेशाध्यक्ष प्रा. नामदेवराव दळवी,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात 275 च्या जवळपास इंग्रजी शाळा आहेत. तर राज्यात ही संख्या हजारोच्या घरात आहे.  त्यांच्या समस्या किती असतील याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. कोरोनाच्या दुष्टचक्रात शाळांमध्ये काम करणारे आपले काही सहकारी आपल्याला कायमचे सोडून गेले पण त्यांच्या साठी आपण छोटी/मोठी वैयक्तिक मदत सोडली तर ठोस काही करू शकलो नाही. शासनस्तरावरून यासाठी काहीतरी व्हावं, हे आणि अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविता येतील मुंबईत पार पडलेल्या  मेस्टा च्या अधिवेशनात सह्याद्री इंग्लिश स्कुल या शाळेस बेस्ट स्कुल हा आवार्ड देऊन संस्थापक  सुदर्शन शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष शिवाजी उमाटे, भारत होकर्णे, सुजित लहानकर, सुहास पाटील टाकळीकर, संदीप भुरे, राजाराम हळदे, सचिन मगरे, यासह मित्र परिवार यांनी  मेस्टा चे मराठवाडा उपाध्यक्ष सुदर्शन शिंदे व सौ जयश्री शिंदे या दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी