महावितरण डीपीवर काम करत असताना अचानकपणे शॉक लागला -NNL


रत्नागिरी |  
शहरा नजीकच्या एमआयडीसीच्या अग्निशमन दल इमारतीजवळ असलेल्या महावितरण कंपनीच्या डिपीवर काम करणार्‍या कर्मचार्‍याला शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वा. सुमारास घडली. अक्षय अशोक फूटक वय 22,रा.शिरगाव-आडी,रत्नागिरी असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. 

अक्षय हा महावितरण कंपनीमध्ये कामाला होता.सोमवारी सकाळी अक्षय एमआयडीसी येथील महावितरणच्या डीपीवर काम करत असताना अचानकपणे त्याला शॉक लागला.त्याच्या सहकार्‍यांनी त्याला तातडीने साळवी स्टॉप येथील खासगी रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालया दाखल केलेे असता उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी