शिका संघटित व्हा संघर्ष करा या जाणीवेतून युवासेनेचा उपक्रम-व्यंकटेश मामीलवाड -NNL


नविन नांदेड|
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त काकांडी येथील जि.प.प्रा.शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नांदेड दक्षिण युवासेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटेश मामीलवाड यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज समाजातील तळागाळातील घटकांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारा त्यांचा इतिहास आठवता,कुठल्याही प्रकारचा वायफळ खर्च करून जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत 'नाचून बिघडण्यापेक्षा,वाचून घडण्याच्या'दृष्टिकोनातून युवासेनेमार्फत हि शैक्षणिक मदत करण्यात आली.

यावेळी उपस्थित युवासेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटेश मामीलवाड,मुख्याध्यापकांसह समस्त शिक्षक वृंद,उपसरपंच संतोष देशमुख, युवासैनिक अक्षय वट्टमवार,प्रा.अविनाश इंद्रवाड,अक्षय गुजूलवार,गणेश वट्टमवार,सिताराम लाडके,सोनबा पाटील,शुभम कांबळे व गावातील समस्त युवासैनिक-ग्रामस्थ याची ऊपसिथीती होती.


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी