नविन नांदेड| भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विनोद कांचनगिरे हे होते तर व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर संघटनेचे अध्यक्ष डॉ. कराळे,डॉ.नरेश रायेवार,संजय कदम,गजानन पाटील कहाळेकर, प्रा.डॉ.रमेश नांदेडकर, शंकरराव धिरडी कर,माणिक श्रोते,यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. रमेश नांदेडकर, डॉ. ललिता शिंदे बोकारे, डॉ. नरेश रायेवार, गजानन पाटील कहाळेकर, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्षीय समारोप प्रसंगी सिडको ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विनोद कांचनगिरे म्हणालेकी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका,संघटित व्हा,आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र दिला.
आज गरीब विध्यार्थी असो अथवा श्रीमंत विध्यार्थी असो ते शिक्षणं शिकून उच्च पदस्थ अधिकारी होत आहेत याचे सर्व श्रेय फक्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर यानाच जात असे प्रतिपादन केले. यावेळी नामदेव पदमने, भुजंग स्वामी, वैजनाथ माने, प्रा.गजानन मोरे, गणेश खंदारे, भगवान जोगदंड, प्रल्हाद जोगदंड, संतोष कांचनगिरे,संगम कांचनगिरे, सौ विमलाबाई चित्ते, सौ अनिता गज्जेवार, सुलोचना बेळीकर, अशादेवी पाताळे, शशिकला होनगुंठे, पुष्पाताई घरटे, ललिता कामठीकर, कुशावर्ता लोकरे, अनुसया शिंदे,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैजनाथ माने यांनी मानले.