उस्माननगर,माणिक भिसे| संविधानाने मानवी जीवनात मानसाचे माणूसपण निर्माण करुन सर्वाना स्वातंत्र्य बहाल केले आहे.म्हणून ह्या संविधानास जगात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. यामुळेच भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नावारूपास आला आहे. असे मत पत्रकार संघाचे सचिव सुर्यकांत मालीपाटील यांनी केले आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे बहुजन नायक , शोषित वंचितांचे मुक्तीदाते , संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड ,सौ.संगिताबाई वि.भिसे, ग्रामसेविका सौ.शिंदे, व्यंकटराव घोरबांड,ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे, अंगूलिमाल सोनसळे, गोविंद पोटजळे, गंगाधर भिसे,दत्ता पाटील घोरबांड, गणेश लोखंडे शिवशंकर,काळे, सजंय वारकड,विजय भिसे, यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
शाळा, महाविद्यालय,व पत्रकार सभागृहात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व तथा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंतीनिमित्त येथील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करून १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. येथील नागवंशीय मित्र मंडळ यांच्या वतीने सामुहिक अन्नदान खिचडीचे वाटप करण्यात आले.
आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात दि.१४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी सामाजिक कार्यकर्ते , समाजाभिमुख नेतृत्व करणारे आमिनशाह फकीरयांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आले.
आमिनशाह फकीर यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार संघाचे सचिव सुर्यकांत मालीपाटील, सहसचिव माणिक भिसे, कंधार तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पठाण अमजदभाई, गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे, काॅग्रेसचे कार्यकर्ते मु.अ. राहुल सोनसळे, ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे ( ग्रामसंवाद समिती संघटक नांदेड) रामदास घोरबांड, यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
सम्राट अशोक प्रा.शाळेत आमिनशाह फकीर यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मु.अ.राहुल सोनसळे, भगवान राक्षसमारे ,मन्मत केसे,दे.ना.डांगे,लाठकर नितीन, शेख,याची उपस्थित होती.जि.प.के.प्रा.शाळेत मुख्याध्यापक जयवंतराव काळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण काळम,पठाण, एकनाथ केंद्रे, सोनकांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
समता विद्यालय, त्रिमूर्ती विद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह,आदी शासकीय कार्यालये येथे महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पत्रकार संघाच्यावतीने अनेक वेळा सामाजिक उपक्रम हाती घेऊन राबविले जातात.महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी,सह असंख्य उपक्रम हाती घेत समाजासमोर नेहमीच एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येते.