नायगाव, दिगंबर मुदखेडे| ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांना लखपती करण्याच्या उद्देशाने फक्त मागेल त्याला काम नाही तर ' पाहिजे ते काम ' या उक्तीप्रमाणे दशवार्षिक नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत मी समृध्द तर गाव समृध्द, गाव समृध्द तर मी समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द करण्याची शासनाची संकल्पना आहे. त्या दृष्टीने नायगाव तालुक्यातील ताकबीड या गावाची निवड करण्यात आली. असून चार दिवसीय कार्यशाळेचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मौजे ताकबीड ह्या नायगाव तालुक्यातील एकमेव गावाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मनरेगा अंतर्गत 262 कामे असून त्याचा दशवार्षिक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविने. प्रत्येक कुटुंबाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध संसाधनांचा विचार करून वयक्तिक लाभाच्या कामाची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे. हे या योजनेचे उद्देश असल्याचे बलूले यांनी सांगितले.
मनरेगा अंतर्गत कामाचे दशवार्षिक आराखडा बनवण्यासाठी चार दिवसांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यामधे पहिल्या दिवशी उद्घाटन कार्यक्रम व शिवार फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुटुंब सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी माहितीचे एकत्रीकरण करून चर्चा सत्राचे आयोजन करणे, तिसऱ्या दिवशी कामाची यादी करून ग्रामसभा घेणे,चौथ्या दिवशी आराखडा अंतिम करून दशवर्शिक आराखड्याचे सादरीकरण केले जाणार असल्याचे विस्तार अधिकारी मुखेडकर यांनी सांगितले. गावाचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील असून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामे करण्याचा निर्धार सरपंच शिवराज वरवटे यांनी बोलून दाखवला.
दश वार्षिक आराखडा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून होनराव सहायक अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग हे होते. तर उद्घाटक म्हणून दिगंबर गोसावी, तालुका कृषी अधिकारी नायगांव हे होते. महेश मुखेडकर विस्तार अधिकारी, गजानन बलुले सहायक कार्यक्रम अधिकारी, सूगावे टी.जी. कृषी विस्तार अधिकारी, चमकुरे तलाठी, सौ.शिंदे मॅडम कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक वाकळे, ग्रामसेवक सौ. गोरखवाड, सौ.घाटे, तांत्रिक साहाय्यक श्री.सुर्यवंशी, वर्णे, कुरे, शेख, तालुक्यातील रोजगार सेवक इंगळे,उपासे,ढगे,वाघमारे,मोरे,रोडे खंडगावकर तर संगणक परिचालक रामकृष्ण मोरे, सरपंच शिवराज वरवटे,उपसरपंच प्र.संभाजी मंडलापुरे, रणजित कूरे संतोष टेकाळे,अशोक पांचाळ, हिरामण किरे,बालाजी कूरें, उमाकांत कुरें आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन बालाजी मंडला पुरे यांनी केले तर आभार सरपंच शिवराज वरवटे यांनी मांडले.