नांदेड| सांगवी (बु.) येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्याम पाटील कोकाटे, काँग्रेस ओबीसी सेलचे सदाशिव पुरी, सत्यवान पाटील अंभोरे, सतीश पाटील कोकाटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करून त्रिसरंण पंचशीला घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना प्रमुख दत्ता पाटील कोकाटे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज देश एकसंघपणे टिकून आहे.
तर श्याम पाटील कोकाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहुन देशावर फार मोठे उपकार केले,कारण भारतासारख्या अतिविशाल खंडप्राय देशासाठी उपयुक्त असे संविधान लिहिणे सोपी गोष्ट नव्हती. ही जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्या शिवाय अन्य कोणीही पेलू शकले नसते.
यावेळी नगरसेवक प्रतिनिधी सदाशीव पुरी यांनी देखील आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब भुक्तरे यांनी केले तर आभार उत्तमराव भुक्तरे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास संघरत्न वाघमारे, बबनराव पोहरे,प्रवीण भुकतरे, नागोराव गायकवाड, संतोष भुक्तरे,विजय भुकतरे,सचिन सरपाते,शंकर सुर्यवंशी,संजय सूर्यवंशी,भीमराव भुक्तरे, देवानंद वायवळे, माधव भुकतरे, हर्षवर्धन भुक्तरे, अविनाश बिराडे, यांच्यासह गावातील उपासक-उपासिका बालक बालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.