नायगाव, दिगंबर मुदखेडे| नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लालंवडी येथे गेल्या दोन महिन्याखाली सामायिक भिंत पाडण्याच्या करणा वरून झालेल्या तुंबळ हाणामारीत लालंवडी येथील रहिवासी असलेले पत्रकार मारोती महाजन कोपंलवार यांच्यासह त्यांची पत्नी सौ स्वाती मारोती कोमलवार यांना गावातीलच आरोपीने मारहाण केल्या प्रकरणी नायागांव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात ३०७ दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्या पासून दोन्ही आरोपी फरार झाले होते परंतु नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे फौजदार बाचावार, पोलीस नाईक साई सांगावीकर, आणि बाबू चरकूलवार यांना सदरील आरोपीच्या गोपीनिय माहिती मिळाल्या वरून खाजगी वाहणाचा आवंब करून बुट्टी बोरी नागपूर येथून जाऊन त्या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील लालंवडी येथील रहिवासी मारोती महाजन कोम्पलवार यांना गावातीलच आरोपी लक्ष्मण माधव संगेपवाड, साईनाथ माधव संगेपवाड यांनी सामायिक भिंत पडण्याच्या करणाहुन सबल, कुऱ्हाड, फावडे वास्तु्चा वापर करून मराहाण केल्या प्रकरणी कोपलवार यांच्या तोंडावर, डोक्यात, आणि डाव्या हातावर, मारून गंभीर जखमी केल्या प्रकरणी नांदेडच्या डॉ तुंगेनवार यांच्या दवाखान्यात उपचार चालू करण्यात आले होते. याच प्रकरणातील दोन आरोपी लक्ष्मण तुकाराम संगेपवाड, साईनाथ लक्ष्मण संगेपवाड यांना नायगाव पोलिसांनी दिनांक २७ एप्रिल २०२२ रोजी नागपूर येथून ताब्यात घेतले. सदरचे आरोपी गेल्या दोन महिन्या पासून फरारच असले तरी नायगाव पोलीस सदरच्या आरोपीच्या शोधातच होते. परंतु अखेर ३०७ गुन्ह्यातील दोन आरोपीला जेरबंद केले आहे.