एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत शकुनी मामानी दोन हजार कोटींची बँक गिळंकृत करण्याचा डाव - गोपीचंद पडळकर -NNL


मुबंई।
मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता.आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला . 

बँकेची निवडणूक घोषीत केलीये आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढल्याच पडळकर म्हणाले . 

साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते  तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही.१९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिल्याचा आरोप देखील त्यानी केला 

 सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल करण्यात आल्याचे पडळकर  म्हणाले . त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये आणि  वाढदिवसानिमित्त मनसोक्त  रक्कम वसूल करण्यात आली . अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केले असं पडळकर म्हणाले .

त्यातूनच  वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या. पण ज्यावेळेस एसटी कामगार आणि त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो. त्या वेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या  सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं  नाही. 

जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत आणि कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी