अर्धापुर, नीळकंठ मदने| अर्धापुर तालुक्यातील पार्डी म .येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार युनूस नदाफ यांचा मुलगा मोहम्मद साद यांनी आपल्या जीवनात पहिला उपवास ( रोजा ) राहिला असून या वयात प्रथमच रोजा राहिल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे .
अर्धापुर तालुक्यातील पार्डी म .येथील पत्रकार युनूस नदाफ यांचा मुलगा मोहम्मद साद यांनी आपल्या जीवनातील पहिला उपवास ( रोजा ) राहिला आहे .एप्रिल महिन्याच्या तीन तारखेपासून प्रारंभ झाला आहे .सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे .उन्हाचे चटके लागत असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तरी लहान मुले व वय वद्ध नागरिक रमजान महिन्यात रोजा राहत आहेत .
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाल्यापासून तापमानात वाढ झाली आहे .अश्या तापमानातही लहान मुले उपवास ( रोजा ) राहत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .रखरखत्या उन्हातही काहीही न खाता - पिता उपवास राहणे हे मोठे आव्हान आहे .तरीपण मोहम्मद साद यांनी आज रोजी दि .१५ रोजी सकाळी सहेरी करून रोजा धरला होता .सायंकाळी ६ : ४४ मिनिटांनी इफ्तार करून आनंद साजरा केला आणि आई - वडील , आजी , काका काकू , भाऊ - बहीण यांनी त्याला गोड पदार्थ भरून त्यांचे अभिनंदन केले .