अखेर कारला गावातील विज पुरवठा २ वर्षानंतर झाला सुरळीत -NNL

दोन डि. पी.घेऊन उपकार्यकारी अभियंता लोणे गावात


हिमायतनगर|
महावितरण कंपनीच्या ठेकेदार आणि कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कारला गावात दोन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने गाव अंधारात होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच महावितरण कंपनी कुंभकर्णी झोपेतून जागी झाली. आई तात्काळ स्वत उपकार्यकारी अभियंता लोणे यांनी प्रत्यक्ष कार्ल गावात भेट देऊन पाहणी केली. लागलीच विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन सिंगल फेजचे ट्रांसफर उपलब्ध करून देऊन गावाचा अंधार दूर केला आहे. त्यामुळे आता कारला वाशियांचा गेल्या २ वर्षपासून अडगळीला पडलेल्या वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम सुटणार आहे. 

कारला गावातील विद्युत प्रवाह एकाच सिंगल फेजच्या ट्रांसफरवर सुरू होता. त्यामुळे हा डि. पी. लोड घेत नसल्यामुळे रातोरात विज गूल होत होती. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. नविन सिगंल फेजचा ट्रान्सफामर दलित वस्ती मध्ये बसविण्यात आला. परंतु सदरील डि. पी. चा केबल संबंधित ठेकेदारने जोडला नसल्यामुळे वीजपुरवठा बंद अवस्थेत होता. त्यामुळे दोन दिवसापासून कारला गाव अंधारात होते. सदरील डि. पी. दुरूस्ती करून तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर लागलीच शनिवारी सकाळी लाईनमन यांना वरिष्ठांनी आदेश देऊन जे साहित्य लागेल ते घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

तातडीने येथील लाईनमन दिपक वाघमारे यांनी आपल्या टिमसह गावातील सिंगल फेज जोडून विद्युत पुरवठा सुरळीत केला. गाव अंधारात असल्याने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी महावितरण च्या वरिष्ठांना बोलून तात्काळ विज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देताच यंत्रणा कामाला लागली आणि कार्यकारी अभियंता लोणे यांच्या कार्यतत्परतेने कारला येथे २५ व्होल्टेज असणारी दोन सिंगल फेज ट्रांसफर उपलब्ध करून दिले. विद्युत पुरवठा होण्यासाठी लागणारे साहित्य देखील दिल्या गेल्यामुळे कार्यकारी अभियंता लोणे यांच्यासह येथील लाईनमन वाघमारे यांच्या प्रयत्नाने गावच्या विजे पुरवठ्याचा प्रश्न सुटणार आहे. 

गेल्या दोन दिवसापासून गाव अंधारात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यामुळे सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी सदरील विद्युत पुरवठा सुरळीत नाही केल्यास महावितरण समोर ग्रामस्थांना घेऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परंतु कामाला सुरुवात झाली असून विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने उपोषण स्थगित केले आहे. गेल्या काही दिवसापासून गावात विजेचा लपंडाव सुरू होता परंतु तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार , सरपंच गजानन कदम, सोपान बोंपीलवार, वसंत मिराशे, अगंद सुरोशे, पिटेश कदम, गणेश नरवाडे, संजय मोरे, आनंद बिर्हाडे, मारोती कदम, रामदास इटेवाड, मुकींद मिराशे,यांच्या प्रयत्नाने गावच्या विजेचा प्रश्न सुटला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी