शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी - गिरिधर पा.केरूरक
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथील शेतक-याचा मागील १५ दिवसां पासून कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उभे ऊस,भुईमूग, सोयाबीन,भाजीपाला पिक करपली आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषी पंपाचा खंडीत विजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर सर्व नुकासानग्रस्त शेतकरयांनी सामुहाईक आत्मदहण कर करणार आहोत याची तालुका प्रशासनाने दखल घ्यावी असा इशाऱ्यांचे निवेदन तालुक्यातील केरूर येथील नुकासानग्रस्त शेतकऱ्यांनी मुखेडचे तहसीलदार, महावितरण अभियंता, पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी केरूर येथील नुकासानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.