दि.१३ एप्रिल रोजी मुखेड येथील झेंडा चौक मारोती मंदिरात ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांचे हरिकिर्तन
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड शहरातील मारोती मंदीर झेंडा चौक मुखेड येथील मारोती मंदीराचा दि. १३ व १४ एप्रिल रोजी कलशारोहण व प्राणपतिष्ठपनेचा भव्य कार्यक्रम होणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या कलशारोहण व प्राणपतिष्ठपनेच्या कार्यक्रमास प्रमुख आशिर्वाद म्हणुन मुखेड गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, लघु आळंदी येवती संस्थानचे सदगुरू नराशाम महाराज,डॉ. सिध्ददयाल महाराज बेटमोगरेकर,ह.भ.प. नामदेव महाराज बारुळकर व पाळा संस्थानचे प्रबोधन महाराज पाळेकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खा.प्रतापराव पा.चिखलीकर,आ.डॉ.तुषार राठोड, माजी नगराध्यक्ष बाबु सावकार देबडवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शहरातील सर्वात जुने असलेलेे झेंडा चौक येथील मारोती मंदीर अंदाजे २५० ते ३०० वर्षापुर्वी असुन या मंदीराचे पाया भरणी पासुन ते कळसापर्यंतचे नवीन जीर्णोध्दार करण्यात आले आहे. या मंदीरातील हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदुर काढण्यात आले असताना बालवीर हनुमानाची मूर्ती जे की मराठवाडयात एकमेव अशी मूर्ती दिसली. या मारोती मंदीराच्या जीर्णोध्दारासाठी अनेक दानशुर व्यक्तींनी मदत केली असुन या मंदीराचे येथील भक्तांनी शासनमान्य ट्रस्ट सुध्दा केले आहे. या कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील झेंडा चौक मारोती मंदीराचे दि.१३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ पर्यंत संकल्प पुण्याहवाचन, मातूृका पुजन,नांदीश्राध्द,मुख्य देवता स्थापन व पुजन होणार आहे तर सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प.श्री विक्रम महाराज नांदेडकर यांचे हरीकिर्तन होणार आहे. तर दि.१४ रोजी सकाळी १० ते १ पर्यंत होमहवन, पूर्णाहूती व दुपारी १ ते ३ नंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशोराहणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी 3 च्या नंतर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.