नांदेड। नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या तर्फे व महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना पुणे यांच्या मान्यतेने नांदेड येथे दि . 10 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञानतीर्थ परिसर , विष्णुपुरी नांदेड येथील मैदानावर जिल्हास्तरीय फक्त 20 वर्षाच्या वरील पुरुष व महिला वरिष्ठ गटातील जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन व राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली .
राज्यस्तरीय स्पर्धा दि 22 ते 25 एप्रिल 2022 या कालावधीत भोसरी पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहेत . स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी सोबत नावनोंदणीसाठी एक फोटो , मुळ 10 वीची सनद , मूळ जन्म दाखला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत आधार कार्ड प्रत्येक क्रिडा प्रकारासाठी 100 रु शुल्क व प्रथम नोंदणी शुल्क 150 रु घेऊन उपस्थित राहावे. राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्पर्धेसाठी किमान कामगिरी पात्रता प्राप्त करणाऱ्या खेळाडूस पुढील स्पर्धेत सहभागी होता येईल.
स्पर्धा निरीक्षक म्हणून योगेश थोरबोले सचिव उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटना हे उपस्थित राहणार आहेत तरी जिल्हयातील 100, 200 , 400, 600,800,5000 , 10000 मी. धावणे, 20,30 कि.मी. चालणे तसेच गोळा फेक भाला फेक , थाळी फेक , हातोडा फेक, लांब उडी, तिहेरी उडी, रिले, क्रॉस कंट्री, या प्रकारामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूनी जास्तीत जास्त संख्येने व आवश्यकत्या तयारीनिशी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर ,उपाध्यक्ष डॉ . अर्जुन मापारे, डॉ दि.भा. जोशी डॉ उमेश भालेराव, जिल्हा क्रिडाधिकारी नादेड राजेश्वर मारावार, गुरुदीपसिंघ संधू, नारायण सूर्यवंशी कुमार कुलकर्णी , अमरीक सिंघ वासरीकर , अविनाश रामगिरवार ,महेंद्र कुडगुलवार , प्रशांत जोशी , निलेश ठक्कर, राजेश तिवाड़ी किशोर पाठक ,
विनोद गोस्वामी, प्रवीण साले, शारदा कदम, सुरेश पद्मावर, रूपाली कुलकर्णी, किरण कुलकर्णी भगवान नागरगोजे, विष्णू पूर्ण प्रा.डॉ. बळीराम लाड, प्रा. अमृत जाधव, वैभव दमकोडवार , डी . डी . चव्हाण , मुजाजी काकडे सविता पतंगे , महेमुदा खान , लक्ष्मण फुलारी, बालाजी भवानकर, संतोष सोनसळे, संतोष आणेराव, बंटी ज्ञानेश्वर सोनसळे, शेख शब्बीर , संतोष वाकोडे, बालाजी गाडेकर, भुजंग चीटेवार , रविकिरण क्षीरसागर, विजय गव्हाणे , डॉ. महेश जाधव , शेख गाँस शेख शादुल गंगाधर हबर्डे , दिनेश उमरेकर, ज्ञानेश्वर कोडलांडे , नंदू जाधव आदी पदाधिकारी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 8625021219 / 8623005600 / 75884 30145 / 9404662277 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धा ठिकाणी नाव नोंदणी करता येईल किव्हा खालील लिंक भरून नाव नोदणी करावी 👉 https://forms.gle/adRD6r3KAQ7qeWv87