नांदेड| कोवीड 19 महामारी दरम्यान आपले कर्तव्य पार पाडत असतांना नांदेड जिल्हयात दोन पोलीस पाटील यांचा मृत्यु झाला होता. त्या पैकी एका पोलीस पाटलाला दिनांक १२ मार्च रोजी पन्नास लाख रूपयाचा चेक पोलीस अधिक्षक नांदेड प्रमोद शेवाळे यांचे हस्ते देण्यात आला होता.
दुसर्या पोलीस पाटलाचा वारसा प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे त्या वेळेस चेक देण्यात आला नव्हता. दिनांक १२ एप्रिल रोजी त्यांचे वारसा हक्काचे प्रमाणपत्र प्राप्त झााल्याने दिवंगत बापुराव महाजन बंलतलवाड, यांना शासनाने पन्नास लाख रूपये सानुग्रह अनुदान मंजुर केले होते. त्यांचे वारसांना आज पोलीस अधिक्षक नांदेड प्रमादे शेवाळे, यांनी सदर पोलीस पाटलांचे कुंटूबीयाना सानुग्रह अनुदान म्हणुन पन्नास लाख रूपयाचा चेक मयताची पत्नी श्रीमती कल्पना बापुराव बंलतलवाड, रा. जोशी सांगवी ता. लोहा जि. नांदेडयांना आदा करण्यात आला.
या प्रसंगी श्रीमती डॉ. अश्वीनी जगताप, पोलीस उप-अधिक्षक (मु.) नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, श्री नरेंद्र नाथराव कुलकर्णी, कनिष्ठ श्रेणी लिपीक, पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड यांचे उपस्थितीत अदा करण्यात आले. सदर अनुदान शासनाकडुन मंजुर करून आणने व कागदपत्राची पुर्तता करून घेण्याचे काम श्री नरेंद्र नाथराव कुलकर्णी यांनी व्यवस्थीतरित्या पार पाडले.