किनवट, माधव सुर्यवंशी| किनवट तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात विक्रांतच्या नावावर आठ्ठावन कोटी रुपये जमा करून महाघोटाळा करणाऱ्या भाजपाच्या किरीट सोमय्या याचा प्रतिमात्मक पुतळा जाळून शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, शहरप्रमुख संतोष यलचलवार , माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , प्रमोद केंद्रे मारोती सुंकलवाड , मारोती दिवसे पाटील , आतूल दर्शनवाड , संजय मुरगुलवार ,पंडीत रासमवार, सुरेश घुमलवा, नागेशराव , नागेश चेंद्रे, आनंद बामणे सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोण रे हे कोण ? हे हे तर देशाचा गद्दार रे गद्दार अशा घोषणा देत जमलेल्या शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
देशाची अस्मिता असलेल्या विक्रमच्या नावावर आठ्ठावण कोटी रुपये गोळा करून देश प्रेमी जनतेची फसवणूक करणाऱ्या सोमय्याला प्रशासनाने देश द्रोही , राष्ट्र द्रोही गुन्हा दाखल करुण सामान्य माणसाच्या भावना दुखावल्या असून, अशा गद्दाराला माफी न करता तात्काळ त्यांच्यावर राष्ट्रीय भावनेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करा. आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा शिवसैनिकांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.