नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचारी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या वतीने आज ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९५ जयंती साजरी करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त सकाळी ९ वाजता शहरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन वर्षा ठाकूर-घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आणि सर्व विभाग प्रमुख यांची या वेळी उपस्थिती राहणार आहे.
सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात इंजि. भीमराव हटकर यांचे आधुनिक भारताच्या निर्मितीत महात्मा फुले यांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या परिसरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, रेखा काळम-कदम, डॉ. नामदेव केंद्रे, व्ही. आर. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा कृषी अधिकारी तानाजी चिमणशेट्टे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. यु. बोधनकर, समाजकल्याण अधिकारी आर. एच. एडके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, सागर तायडे, ओमप्रकाश निल्ला, ए.आर. चितळे, अशोक भोजराज आदींची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती जयंती मंडळाचे अध्यक्ष अशोक कासाळकर, कार्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तींबिरे, सचिव बाळासाहेब लोणे, कोषाध्यक्ष राजेश जोंधळे आणि जयंती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.