हदगाव, शे चांदपाशा| उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय कर्मचाऱ्यांच्या आदोंलनाचा साहावा दिवस असुन, या आदोंलनामुळे कार्यालयीन कामकाज बंद पडले आहे. यामुळे दुर्गम भागातील शेतकरी व नागरिकांना माणसिक अर्थिक मणस्ताप सहन करावा लागत असुन विशेष म्हणजे आता शाळा महाविद्यालये नियमितपणे सुरु असल्याने त्याचे शालेय महाविद्यालय करिता लागणारे दाखले मिळत नसल्याने त्याच्या कामाचा खोंळबा होत आहे.
अव्वल कारकून संवर्गातुन नायब तहसिलदार संवर्गातुन पदोन्नती मागील दोन वर्षापासून होत नसल्याने तसेच महसुल सह्याकाची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असलेली भरण्यात येत नसल्याने त्याचा अतिरिक्त कामाचा ताण हा कार्यरत आसणा-या नायब तहसिलदार व वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांवर येतो आहे. आश्या विविध मागण्या घेवुन महसुल कर्मचारी बे-मुदत आदोलन करित असल्याने हदगाव शहरातील उपविभागातील व तहसिल कार्यालयात कामकाज ठप्प आहे. या आदोलनामुळे हदगाव तालुक्यातील तामसा, मनाठा व निवघा सर्कल मधील अतिदुर्गम गावातील नागरिकांचे जातीचे,
नाँनक्रिमनल, प्रमाणपञ शेती संबधीत प्रक्रणे तसेच संजयगाधी निरधार योजना, श्रावण बाळनिराधार योजना, इंदिरागांधी योजना, कुंटुब अर्थसाह्य तसेच उत्तपन्नाचे प्रमाण-पञ आदी कामे होत नसल्याने नागरिक व विद्यार्थी ञस्त झालेले आहेत.
यात आमचा काय..? दोष - निवडणूक वेळी नागरिकांच्या प्रत्येक कामाची दखल लोकप्रतिनिधी घेत आसतात प्रशासकीय कर्मचा-याचा संप जेव्हा होतो. तेव्हा सर्वसामान्य लोकांना वेठीस का..? धरण्यात येते. त्यांना का मणस्ताप दिला जातोय या बाबतीत तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर सह जिल्ह्यातील आमदार या आदोलनच्या बाबतीत थेट महसुलमंञ्याशी का..? संपर्क करित नाहीत. असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिक करित आहेत.