अर्धापूर, निळकंठ मदने| अर्धापूर तालुक्यातील लहान येथील शेतकरी आनंद भागोजी लोणे यांनी आपल्या शेतीत पारंपारिक शेती बरोबर नवीन प्रयोग म्हणून एक हेक्टर मोहगणी वृक्ष लागवड केली व सोबतच वीस गुंठे जमिनिवर काळी हळद शेन्द्रीय पध्दतीने लागवड करून या काळी हळद पीकाचे 14 किंवटल उत्पादन काढले असून बाजारमुल्य जवळपास दहा लक्ष आहे.हा त्यांचा नवीन प्रयोग चांगला उत्पन्न देणारा असून अनेक शेतकरी त्यांना भेट घेऊन पीकाची माहिती घेत आहेत.
(अर्धापूर तालुका परिसह हा ऊर्ध्व पैनगंगा सिंचन कार्यक्षेत्रातील परिसर असून तालुक्यात बागायती शेती केली जाते शेतकरी केळी,हळद,उस,गव्हू हरभरा, मुग, उडीद,ज्वारी, सोयाबीन,कापूस आदी पीके घेतात मुख्यत्वे केळी व उस पीक मोठ्या प्रमाणात असते.मात्र मागील कांहीं वर्षापासून केळी पिकाचे घसरलेले भाव व उसासे क्षेत्र वाढल्याने कारखाना वेळेवर उस नेत नाही अश्या परिस्थितीत शेतकरी आपल्या शेतात एकतर पारंपारीक पीक घेणे पसंद करत आहे तर कांही शेतकरी आपल्या शेतीत नवीन प्रयोग करीत आहेत. तालुक्यातील कांही शेतकर्याने सिताफळ,ड्रॅगण फ्रुट,चिकू,संत्रा असे उत्पादन घेतले आहे.
आसाच नवीन प्रयोग म्हणून लहान येथील माजी सरपंच भागोजी लोणे यांचे चिरंजीव आनंद लोणे यांनी केला आहे. त्यांनी आपली शेती बाजारातील मागणी लक्ष्यात घेऊन आधुनिक व शेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला व मागील जून महिन्यात दुबई व देशातील औषध कंपण्यासोबत करार करून आपल्या शेतीत एक हेक्टर जमिनीवर मोहगणी वृक्षांची लागवड केली आहे. ही झाडे आता चांगलीच वाढली आहेत.या सोबतच (विस गुंठे) अर्धा एकर जमीनीवर काळी हळद सेंद्रिय पध्दतीने दिड क्विंटल बेणे लागवड केली व पीकांचे व्यवस्थित पाणी नियोजन व योग्य वेळी निंबोळी अर्क फवारणी केली.यावर्षीचा हंगाम हा हळद पीकासाठी फारसा चांगला नव्हता पण आश्याही परिस्थितीत त्यांनी काळ्या हळद पीकाचे बर्यापैकी उत्पादन काढले आहे.त्यांनी जवळपास 14 क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले असून कंपनी सोबत केलेल्या करणारानुसार दहा ते बारा लक्ष रूपयाचे उत्पन्न काढले आहे.त्यांनी आपल्या शेतीत नवीन प्रयोग करून चांगले उत्पन्न घेतल्याने अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन माहिती घेत आहेत.
याबाबत शेतकरी आनंद लोणे यांच्याशी चर्चा केली असता माहिती देतांना म्हणाले कि,मागील कांही वर्षापासून केळी व उस पीकाने तोट्यात होतो शिवाय केळी पीकणे,भावामुळे व उस वेळेवर जात नाही यामुळे खुपच मनस्ताप व्हायचा पण जे आहे ते सुरू होते.असे असतांना माझा दिली स्थित मित्र अभय मंगला यांच्या सोबत आसामच्या दौर्यावर असतांना त्यांच्याकडे काळ्या हळदीचे मोठे शेतकरी असून त्यांचा अनेक कंपनीच्या सोबत करार आहे.त्यांनी मला या पीकाबाबत माहीती दिली व त्यांनीच काळ्या हळदीचे 3 क्विंटल बेण दिलं बेन आणून लागवड करावे कि नाही अश्या मनस्थितीत होतो.पण दरवर्षी पीक जातंय तर बघू म्हणून शेवटी मी शेणखताने जमीण खतवली व शेतीची मशागत करून बेड पध्दतीने जून मध्ये विस गुंठे जमीनीवर जवळपास एक ते सव्वा क्विंटल बेणे पेरणी केली.
पावसाळ्यानंतर ठिबक सिंचन केलं आवश्यक तेंव्हा लिंबोळी अर्क फवारणी केली कोणतेही रासायनिक खत अथवा फवारणी केली नाही.पुर्णपणे शेंद्रीय पध्दतीने पीक घेतले.पीक तेव्हढे चांगले नसले तरी बर्याच पैकी उत्पन्न झाले आहे. जवळपास 14 क्विंटल हळद झाली आहे.करारा प्रमाणे दहा ते बारा लांखाच उत्पन्न झाल आहे.हे पीक 15 ते 45 तापमान व आपल्या जमीनीत चांगले येते.पीक काढणीनंतर शिजवणे व वाळवणे झंजट नाही. पण शेतकर्याने रासायनिक खत अथवा किटकनाशक वापरू नये पुर्णपणे शेंद्रीय पध्दतीने उत्पादन घ्यावे आपल्या मालाची केमिकल चाचणी केली जाते. सेन्द्रिय पीक घेतले तरच योग्य भाव मिळतो.ह्या हळदीचा सौंदर्य प्रसाधने,आयुर्वेद औषध,इतर औषधीसाठी वापर केला जातो त्यानी सांगितले आहे.तर मोहगणी वृक्ष लागवड शेती बाबत म्हणाले कि मी हे वृक्ष प्रत्येक रोप तिनशे रूपये किंमत याप्रमाणे गाजीयाबाद येथून खरेदी करून आनले व आडीच एकर (एक हेक्टर)जमीनीवर आठ फूट अंतरावर लागवड केली ही झाडे चांगले आले आहे.
आता आठ महिने झाले.या झाडाला पाच वर्षानंतर फळ येतात याफळापासून औषधी तेल बनवल जात बाजारात पाचशे रूपये किलो प्रमाणे किंमत याप्रमाणे फळाला भाव मिळतो.आणी हे वृक्ष जवळपास दहा किलोमीटर परिसरात प्रदूषण स्वछ करते.व हे वृक्ष खुप उंच व मोठे होतात लाकूड टिकाऊ व मजबूत असते पाण्यातही शंभर वर्ष टिकते या लाकडाचा जहाज निर्मितीसाठी वापर होतो. केन्द्र सरकार कडून प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी हेक्टर प्रमाणे अनुदान मिळते.असे या मोहगणी वृक्ष व लाकडाचे शेतकरी उत्पन्न घेता येते.असे आपल्या शेतीत नवीन प्रयोग करून आधुनिक शेती करणारे शेतकरी आनंद लोणे यांनी माहिती देताना सांगितले आहे..