सरपंच गयाबाई घोरबांड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सर्वानुमते लक्ष्मण गोविंदराव काळम यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. १५ सदस्य असलेल्या नव्या समितीत धनंजय विठ्ठलराव घोरबांड, गणेश विश्वासराव लोखंडे,संतोष वैजनाथराव घोरबांड, गंगाधर निवृत्ती भिसे, विनायक भगवान घोरबांड, यांच्या सह महिला सदस्य म्हणून विद्या गजानन काळम, शिवकाशी अशोक मोरडे, वेणूताई बापूजी काळम, तस्लिम बेगम जावेद शेख, आश्विनी माणिक घोरबांड, रूपाली राम मोरे, आश्विनी गजानन घोरबांड, इसुमोबीया इसुब पठाण, अंबिका रामदास सोनटक्के यांचा समावेश आहे.
या बैठकीस शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे, गोविंद पोटजळे, कचरू घोरबांड, संजय वारकड, बालाजी घोरबांड आदींची उपस्थिती होती. बैठकीचे संचालन व निवड प्रक्रिया एकनाथ केंद्रे व मुख्याध्यापक जयवंत काळे यांनी पार पाडली.
यावेळी नुतन अध्यक्ष लक्ष्मण काळम यांनी शाळेचा परिसर स्वच्छ व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यकतेनुसार प्रयत्न करणार,शाळेचा परिसर स्वच्छ,निर्मळ ठेवण्यासाठी लक्ष देवू असे आश्वासन दिले. नवीन निवडण्यात आलेल्या सदस्यांचे गावातील पोलिस पाटील विश्वाभंर मोरे ,दत्ता पाटील घोरबांड ,अमिनशा फकीर, अशोक काळम, शिवशंकर काळे, यांच्यासह उपस्थित पाहुणे व पालकांच्या वतीने स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.