हिमायतनगर| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने बौद्ध बांधवांनी वागले पाहिजे त्यांनी विचार दिले त्या विचारामुळे जर आपण वागलो तर समाजात पैसा पेक्षा मौल्यवान धन म्हणजे विचाराचे धन मिळते. जर माणूस शिलवान झाला... चारित्र्यवान झाला... तर पद संपत्ती सर्व आपल्या मागे लागल्या शिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने विचाराने वागले पाहिजे असे धम्म प्रवचनकार भिख्खू पय्या बोधी यांनी व्यक्त केले.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कारला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भिख्खू पय्या बोधी यांच्या धम्म प्रवचनाचे आयोजन प्रा. डी. डी. घोडगे यांनी शनिवारी केले होते. या निमित्ताने बौद्ध उपासिका यांनी भिख्खू पय्या बोधी यांचे दिव्य प्रकाश हातात घेऊन भव्य स्वागत केले. यावेळी प्रवचनात भिख्खू पय्या बोधी यांनी उपस्थितांना सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हि विचाराने साजरी झाली पाहिजे. प्रत्येक माणसाने शिलाचे पालन केले नाहीतर अद्दोगती होते चांगल्या गोष्टी माणसाने स्विकारल्या पाहिजे.
आपल्या मध्ये श्रध्दा बलवान असली पाहिजे बाबासाहेब यांनी सर्वांचे कल्याण केले आहे. बुध्दांनी सांगितले चांगल्या गोष्टी माणसांना करता ऐतात तेच माणसाने केले पाहिजे. चांगल्या मार्गाकडे वळले त्याच भले होणार आहे मुर्ख लोकांची संगती करू नका अज्ञानी लोकांची संगत ठेवू नका माता पित्यांची सेवा करा ज्यांनी जन्म दिला ज्या आपल्या लहानाचे मोठे केले. त्यांची सेवा करा आयुष्यभर जन्म देणाऱ्या माता पित्याची सेवा केली तरी उपकार फिटणार नाहीत.
नित्यनियमाने पंचशिला घेऊन ध्यान केले पाहिजे सन्मानाचा अवलंब करा तेंव्हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसे निर्माण होतील असे प्रवचन व्यक्त केले. व ग्रामीण भागातील मोठ्या पदावर गेलेल्या व्यक्ति ने समाजाकडे पाठ फिरू नये प्रा. डी. डी. घोडगे यांच्या सारखे विचार असणारी उच्च पदावर असणारी व्यक्ती समाजाच्या हितासाठी असेल तर आजची पिढी देखील सुधारल्या शिवाय राहाणार नाही असेही धम्म प्रवचनात भिख्खू पय्या बोधी यांनी सांगितले. प्रा. इंगोले, ए के. हानवते. एम. यू. हानवते, राजु सोनकांबळे, सुरेश गडपाळे, प्रताप लोकडे, बाबासाहेब मुनेश्वर, यांची उपस्थिती होती. व गावातील बौद्ध उपासक उपासिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.