चालत्या बसमधून विजेचा प्रवाह आल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या; 2 भावांसह तिघांचा जागीच मृत्यू -NNL


जयपूर|
भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या जैसलमेर जिल्ह्यात एक मोठी घटना घडली. प्रवाशांनी  भरलेल्या बसमधून विजेचा प्रवाह आला. यामध्ये ८ प्रवासी जखमी झाले असून, यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानातील खीया आणि खुईयाला गावात लोकांनी एक बस भाड्याने घेतली होती. बसमध्ये संत सदारामच्या जत्रेत दर्शनासाठी गेले होते. ओव्हरलोड बसमध्ये काही लोक बसच्या छतेवर बसले होते. दर्शन करून परत जाताना काही लोक बसच्या छतावर बसले होते. तारेच्या संपर्कात आल्यामुळे करंट लागला आणि यात काही जणांचा मृत्यू झाला.

या अपघाताच राणाराम (60), नारायणा राम (55) पुत्र किरता राम आणि पदमाराम करणा (42) यांचा जागेवरच मृत्यू झाला. प्रभू राम (30) निवासी नग्गा गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जोधपूर रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. त्यांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले.

विजेच्या तारा रस्त्यावर लोंबकळत होत्या.. प्रत्यक्षदर्शी पोलजीच्या डेअरी गावचे शरीफ खान यांनी सांगितलं की, PWD कडून रस्त्याचं बांधकाम सुरू होतं. रस्ता उंच झाल्यामुळे विजेच्या तारा खाली लोंबकळत होत्या. हे बसचालकाच्या लक्षात आले नाही. आणि विजेची तार छतावर बसलेल्या लोकांच्या संपर्कात आली. शरीफने सांगितलं की, विजेच्या विभागाकडे लोंबकळत्या विजेच्या ताऱ्यांविषयी तक्रार केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं जात आहे.

बस अपघाताच्या तपासाचे आदेश जिल्हा परिवहन अधिकारी टीकूराम यांनी सांगितलं की, बस 56 सीटर आहे आणि कागदपत्रदेखील व्यवस्थित आहेत. त्यांनी सांगितलं की, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. याचा तपास केला जात आहे. 8 जखमी आणि जळालेल्या लोक बसच्या छतावर बसले होते. बसमध्ये 60 ते 70 जवळ प्रवासी होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी