एक हजार रुपयांचे कपडे ड्रायक्लिन करा अन एक लिटर मोफत मिळवा
अक्षय ड्रायक्लिनर्सची ग्राहकांसाठी 28 वी योजना
नांदेड| ’अक्षय’ सेवेच्या 28 व्या वर्षपूर्तीनिमित्त खास ग्राहकांसाठी अभिनव उपक्रम आजपासून राबविण्यात येणार आहे. या योजनेत 1000 रुपयांचे ड्रायक्लिनींग करून घेणार्या ग्राहकांना एक रुपयात एक लिटर पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे.
‘सेवा परमो धर्मः’ हे ध्येय समोर ठेवून अक्षय ड्रायक्लिनर्स मराठवाड्यासह राज्यात एक ब्रँड बनला असून ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना, नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून समाजकार्य करीत आहे. अक्षय ड्रायक्लिनर्समध्ये 1000 रुपयांचे कपडे ड्रायक्लिनिंग करून घेणार्या 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल अगदी मोफत मिळणार आहे. या योजनेचा लाभ प्रथम येणार्या 1000 ग्राहकांना ही सुविधा 15 मे 2022 पर्यंत देण्यात येणार आहे.
‘अक्षय’ सेवेची 27 वर्षे - नांदेडकरांच्या सेवेत गेल्या 27 वर्षांपासून अक्षय ड्रायक्लिनर्स प्रामाणिकपणे नित्य सेवा देत आहे. ग्राहकांच्या अक्षय प्रेमामुळे आम्ही आमच्या 10 हजार ग्राहकांना सक्षमपणे सेवा देऊ शकलो, याबद्दल आम्ही सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभारी आहोत. प्रो.प्रा.विनोद बाहेती अक्षय ड्रायक्लिनर्सने नुकतेच ‘अक्षय’चा उत्तराधिकारी म्हणून ‘यंगमॅन’ राजू चौडेकर यांना घोषित केले आहे. गेल्या 27 वर्षांमध्ये आयएसओ, क्रिसल रेटिंग, एमएसएमई, एनएसआयसी यासह दमरेकडून 7 पुरस्कार, विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडून सर्टिफिकेट व अवार्ड स्वकष्टाने प्राप्त केले आहेत. ‘अक्षय’ ग्राहकांच्या सेवेबरोबरच धार्मिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. गोसेवा, रक्तदान शिबिर तसेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय दिनानिमित्त राष्ट्रध्वजाची निःशुल्क स्वच्छता करून देशसेवेची पूर्ती करीत आहे.
संत ना छाडै संतई, जो कोटिक मिले असंत ।
चन्दन भुवंगा बैठिया, तऊ सीतलता न तजंत ।
संत कबीराच्या या दोह्या प्रमाणे ‘संत आपला सज्जनपणा कधीच सोडत नाही. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला कितीही सापांनी वेडा घातला तरीही ते आपली शीतलता सोडत नाही.’ त्या प्रमाणे ‘अक्षय’वर आतापर्यंत अनेक संकटे आली तरीही त्यांनी आपली संतवृत्ती सतत जोपासली आहे. याच संतवृत्तीने समाजातील दीनदलितांच्या सेवेची कास धरलेल्या अक्षय ड्रायक्लिनर्सने अनेक वर्षापासून मूकबधीर विद्यालय, अनाथाश्रम व नेरली कुष्ठधाम येथील सर्व कपडे, साहित्याचे मोफत ड्रायक्लीनिंग सेवा सुरुच ठेवली आहे. आजपर्यंतच्या उपक्रमात संतश्री जगदीशजी महाराज यांची रक्तदान तुला केली होती, हा सर्व उपक्रमात लक्षणीय ठरला आहे. असे उपक्रम घेणारी अक्षय ड्रायक्लिनर्स ही मराठवाड्यातील एकमेव संस्था ठरत आहे.
कोरोना 19 ने भारतात प्रवेश केल्यापासून व्यापारात मोठे नुकसान झाले तरीही त्याची कुठलीही तमा न बाळगता मोठ्या हिमतीने ’अक्षय’वर मनापासून प्रेम करणार्या ग्राहक व मित्रांमुळेच आज आम्हाला ’अच्छे दिन’ पहावयास मिळत आहेत. याचे भान ठेवून सध्या वाढत असलेली महागाई विशेषतः पेट्रोलचे दिवसागणिक वाढत चाललेले दर लक्षात घेऊन ग्राहकांना कांहीतरी दिलासा मिळावा ही सदिच्छा ठेवून आमची सेवा घेणार्या ग्राहकांसाठी 1000 रुपयात ड्रायक्लिनींग करून घेणार्या ग्राहकांना 1 लिटर मोफत पेट्रोल देण्याची योजना आखली आहे. आमच्या सर्वच ग्राहकांनी या योजनाचा लाभ घेऊन आम्हाला सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन प्रो. विनोद बाहेती व उत्तराधिकारी राजू चौडेकर यांनी केले आहे.