उत्तर जिल्हाप्रमुख पदी विद्या वाघमारे तर दक्षिण जिल्हाप्रमुख पदी रजनी मेडपल्लेवार
नांदेड| सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेच्या नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख पदी सौ विद्या ताई वाघमारे तर नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख पदी सौ रजनीताई मेडपल्लेवार यांची निवड करण्यात आली असून. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके यांचे हस्ते देण्यात आले आहे. सदरच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात प्रभावशाली संघटना म्हणून नावारूपास येत असलेल्या आणि संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा संघटनेचा घटक होण्यासाठी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई वाघमारे व रजनीताई मेडपल्लेवार यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही ही महिला सामाजिक क्षेत्रात मागच्या १५ वर्षांपासून कार्यरत आहेत, स्त्रियांवरील अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठवणार्या व न्याय मिळवून देणाऱ्या महिला म्हणून ओळखल्या जातात यांची जनशक्ती संघटनेच्या नांदेड महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याने नांदेड जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी बळ मिळणार आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेवून काम करणाऱ्या दोन्ही महिलांच्या कामाची दखल घेवून संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके यांनी नांदेड जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख पदी निवड करुन नियुक्ती पत्र दिले आहे. संघटनेचे ध्येय धोरणे व शेतकरी, कामगार, निराधार यांचा आधार होण्याबरोबरच संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करावे अशी अपेक्षा तिडके यांनी व्यक्त केली.
सदर निवड ही विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठेवण्यात आली होती.जनशक्ती संघटनेच्या नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयात सर्व प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांना व सामाजिक कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाचे वाटप करण्यात आले आणि दोन्ही महिला जिल्हा प्रमुखांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष बाळू पाटील शिरफुले, जिल्हा सचिव दिनेश पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे, छत्रपती संभाजी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय कदम, जनशक्ती संघटना हादगाव तालुका अध्यक्ष दादाराव खंदारे, बामसेफचे विधानसभा अध्यक्ष जावेद शेख लहानकर, पत्रकार शरद कदम आदी उपस्थित होते.