ओबीसी कर्मचारी समन्वय समितीतर्फे लवकुश जाधव यांचा गौरव -NNL


नांदेड |
ओबीसी कर्मचारी समन्वय समितीतर्फे करण्यात येणार्‍या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात युवा क्रीडापटू लवकुश मधुकरराव जाधव यांचा नुकताच प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून ओबीसी कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने दि. १३ मार्च रोजी अभिवादन व ओबीसी समाजातील आदर्श शिक्षक व गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ओबीसी समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा व आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यात नांदेड जिल्हा हौशी कराडे डु असोसिएशनचे अध्यक्ष लवकुश मधुकरराव जाधव यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी ईबितदार, मार्गदर्शक म्हणून प्रा. सुशिलाताई मोराळे, नामदेवराव आयलवाड, साहित्यिक देविदास फुलारी, व्यंकटेश चौधरी, प्रकाश राठोड, सौ. अरुणा गिरी मॅडम, स्वाती मुंडे, ललीता जाधव, मनोहर राठोड, संदिप यशिमोड, मधुकर जाधव आदींची उपस्थिती होती. लवकुश जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे गजानन फुलारी, योगाजी राठोड, अंकुश जाधव, संदिप आडे, मुकेशजी सबाना आदींनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी