आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन -NNL

एकदरा, निळा, वडवणा/खडकी, धानोरा गावांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी


नांदेड।
उत्तर मतदार संघातील गावांना आ. बालाजीराव कल्याणकर यांनी एकदरा, निळा, वडवणा/खडकी, धानोरा  ग्रामपंचायती अंतर्गत सी. सी. रस्ता व पेव्हर ब्लॉक या कामांना  प्रत्येकी पन्नास लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. रविवारी या कामाचे भूमिपूजन आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जयंवत कदम, सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष नारायण कदम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन कदम, सरपंच बालाजी पोपळे, संजय पोहरे, रोहित हिंगोले, गंगाधर बोकारे, नागोराव कदम, अशोक भोजने, वैजनाथ सुर्यवंशी, होणाजी जामगे, हनुमान चंदेल, सचिन पाटील, जगजिवन गायकवाड यांच्यासह आजी - माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.


या भुमिपुजन प्रसंगी बोलताना आ. बालाजी कल्याणकर म्हणाले की, मी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गाव चिखल मुक्त गाव, भूमिगत गटारे  व भविष्यात पाणी टंचाई होऊ नये, यासाठी ग्रिड योजना करून, प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांना शेतातील मालवाहतूक करण्यासाठी शेत रस्ते, शिव रस्ते व पांदन रस्ते यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कल्पनेतून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी, मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते या योजनेतून मतदार संघातील 65 किलोमीटर रस्त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी 16 कोटी 25 लाख निधी उपलब्ध झाला आहे. भविष्यात अजून भरपूर निधी खेचून आणणार असे आ. बालाजी कल्याणकर यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम यांनी आ. बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला तुटपुंजी मदत न करता, शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे वचन दिले होते. त्याच कल्पनेतून आ. बालाजी कल्याणकर हे ग्रामीण भागातील लोकांना व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करत आहेत. 

आ. बालाजी कल्याणकर हे गावांतर्गत विकासकामांना निधी तर देतच आहेत. पण ग्रामीण भागातील जनतेसाठी वाडी बु. येथे 100 खाटांच्या दवाखान्यासाठी 53 कोटी निधी आणला आहे. शेतकऱ्यांचा विचार करून शेतातील माल शेता बाहेर काढण्यासाठी वेळ, पैसा व कष्ट कमी करण्यासाठी आ. कल्याणकर यांनी रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून मतदारसंघामध्ये 65 किलोमीटर शेत पांदन रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी जो निधी आणला आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. या सगळ्या विकासकामा साठी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम यांनी शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या व तालुक्यातील सरपंच यांच्या वतीने आ. बालाजी कल्याणकर यांचे जाहीर आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी