कॅशीयर पापुलवाड यांनी परिवारासाठी निवडला दळणाचा स्वंयरोजगार
मागील दोन-तीन वर्षापासून राज्यभरातील कोरोना या महामारीच्या संसर्गजन्य रोगाने ग्रस्त होते.अनेकजन एकमेकांच्या समोर येवून मदत करायला तयार होत नव्हते. एकमेकांना प्रपंचा विषयी माहिती सुध्दा विचारण्यास समोर येत नव्हते.सर्वजन घरात बसून आहे त्यामध्ये समाधान मानून दिवस ढकलत होते.यामध्येच एसटी कर्मचारी बांधवांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी पुकारलेला संप अजूनही अनिर्णित अवस्थेत सुरू असून, अनेक कर्मचारी बांधव अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. आर्थिक विवंचनेत कुटुंबे सांभाळली जाणे जिकिरीचे ठरत असतांना अनेकांनी स्वरोजगारातून सावरण्याचा मार्ग हाती घेतल्याचे चित्र असताना जोशी सांगवी ( ता. लोहा) येथील राजेश्वर पापुलवाड या तरूणाची धडपड लक्ष वेधून घेत आहे .
मनस्वी मिनी दालमिल व गृह उद्योग सुरू करून पापुलवाड यांनी संप कालावधी मध्ये कुटुंब सावरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग यांच्या योजनेतून प्रक्रिया संच मिनी डाळ मिल यंत्र, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान स्वयंचलित यंत्रे कापणी यंत्र रिपर घेऊन स्वरोजगारातून आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न पती, पत्नी दोघेही करत आहेत. हे विशेष.
एसटीच्या कर्मचारी बांधवांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी कुटुंबे अतिशय हालाखीची अवस्था भोगत आहेत. लवकरात लवकर कर्मचारी बांधवांना दिलासा देणारा निर्णय होवून संप मिटून पुन्हा लालपरी समृद्धी पेरीत धावावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. राजेश पापुलवाड व त्यांच्या पत्नी हे दांपत्य पदविकाधारक असून सुध्दा मोठेपणाचा कधीच गर्व न ठेवता आपल्या परिवाराचे उदारनिर्वाह कशाप्रकारे करु शकतो असे समाजा पुढे आदर्श ठेवला जात आहे.एसटी संपामुळे कुटूंबाची झाली उपासमार अन् पापुलवाड परिवारासाठी निवडला दळणाचा स्वंयरोजगार. पापुलवाड परिवार सेवा देताना नागरिक चर्चा करीत आहेत.