हजारो राम भक्तांनी रथ यात्रेचे सामील होऊन हिंदू जन शक्तीचे विराट रूप दर्शविले -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
उन्हाची पर्वा न करता हजारो राम भक्त पाच तास सामील होऊन हिंदू जन शक्तीचे विराट रूप दाखवल्यामुळे श्रीलंकेत अयोध्येकडे जाणाऱ्या श्रीराम वन गमन पथ काव्य रथ यात्रेचे भारतात अतिभव्य स्वागत नांदेडमध्ये झाले आहे.

संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, शशिकांत पाटील, गणेशसिंह ठाकूर, गणेश कोकुलवार, संतोष ओझा, श्रीराज चक्रवार, महेश देबडवार,चेतन पंडित, कृष्णा इंगळे, सागर जोशी, धीरज स्वामी यांच्यासह अनेकांनी गेल्या दोन महिन्यापासून केलेल्या तयारीला प्रचंड यश मिळाले. रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून स्वागत समिती अध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, प्रवीण पाटील चिखलीकर, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, डॉ.संतुकराव हंबर्डे, राजेंद्र हुरणे, गंगाप्रसाद तोष्णीवाल, ,डॉ. हंसराज वैद्य, दिलीप मोदी, अशोक गोयल, प्रा.के.एच. दरक, अमर लालवाणी, ॲड. मिलिंद एकताठे, श्रीराज चक्रवार,  सुभाष कन्नावार, ॲड.सी.बी. दागडिया,तरूण सहाणी, केशव मालेवार, मुकेश अग्रवाल, सतीश सुगनचंदजी शर्मा,रमेशसिंग हजारीसिंह राजपूत, लड्डू पुरोहित, लक्ष्मीकांत कळणे, श्रेणीक नागडा, राजन मंत्री, ॲड. चैतन्यबापू देशमुख यांच्या हस्ते आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली. 

सर्वात पुढे अतिशय शिस्तीत जाणाऱ्या बालक भजनी मंडळाचे सदस्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत सुषमा ठाकूर व भगवे ध्वज घेतलेले  चार घोडेस्वार दिमाखाने चालत होते. राम भक्त हनुमान व त्यांच्या पाठीमागे राम दरबारची आकर्षक झांकी पाहून अनेक जण सेल्फी घेत होते. त्यानंतर विकाससिंग परदेशी यांच्या दमदार आवाजाने संजीवनी भजनी मंडळाच्या सर्व सदस्य यांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस भजनाने हजारो तरुण बेधुंद होऊन नाचत होते. जकाते बंधू यांच्या टीमने झाडून स्वच्छ केलेल्या रस्त्यावर चरण पादुका असलेल्या रथाचे आगमन झाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी भगवे कपडे घालून मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. 


त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यानंतरच्या वाहनात असलेली अठरा फूट उंचीची आकर्षक रामाची मूर्ती पाहून भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. जागोजागी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत नागरिकांनी आरती केली. गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम, बजरंग बली की जय, सियावर रामचंद्र की जय, भारत माता की जय, रॅली नही ए रेला  है, हिन्दुओ का मेला है या घोषणांनी सरोवरास परिसर दणाणून गेला. दिपकसिंह रावत, दिलीपसिंग सोडी गणेश महाजन, दिलीपसिंह हजारी,राजपूत टास्क फोर्स,श्री शिवतीर्थ प्रतिष्ठान,अक्षय रावत,हनुमान पेठ व्यापारी मंडल,सुमित मुथा,श्री बालाजी मंदिर वैष्नव परिवार,आकाश कापकर भोई गल्ली यांच्यासह अनेकांनी रस्त्यात केळी, थंडपेय,खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. संस्कार भारतीच्या महिलांनी जागोजागी आकर्षक रांगोळ्या काढल्या. 


राम भक्तांचा उत्साह इतका प्रचंड होता की जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हनुमान पेठ,  मुथा चौक, शिवतीर्थ, गांधी पुतळा ,चिखलवाडी कॉर्नर, पंचवटी हनुमान मंदिर मार्गे मल्टीपर्पज हायस्कूल पर्यंत मिरवणूक कधी संपली हे कळाले देखील नाही. समारोप प्रसंगी संयोजन समितीतर्फे चार क्विंटलची खिचडी वाटप करण्यात आली. अतिशय शिस्तीत निघालेल्या या अतिभव्य शोभायात्रेत बंदोबस्तासाठी पोलिस आधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. परंतु धर्मरक्षकाचे उपरणे घातलेले स्वयंसेवक जातीने लक्ष देत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. राम रथ यात्रा यशस्वी करण्यासाठी शिवासिंह ठाकूर,नरेश आलमचंदानी, सोनू उपाध्याय,नरसिंग गुर्रम,बजरंगसिंग ठाकूर, अनिलसिंह हजारी, सागर जोशी, वैभव दरबस्तवार,गोविंद भोसले, आनंद मरेवार, प्रकाश शर्मा,साईनाथ वैजवाडे, प्रल्हाद अंकमवार,सचिन वानोळे,राजेश देशमुख, कन्हैयासिंह हजारी ,विनायक मालपाणी, सत्यम ठाकूर,शैलेश कांकर  शुभम परदेशी संजय देऊळगावकर , 


प्रणव क्षीरसागर,हितेश उदावंत, गिरीश रघुजीवार, मनीष बियाणी, शितल खंडील ,रोहित सोनवणे, निलेश बिराजदार ,मोहन पाटील, शुभम परदेशी, गणूसिंह परिहार, राजाभाऊ खरे, सनीसिंह बिसेन,सागर शर्मा ,अक्षय भोयर, विजय बोरलेपवार ,अशिषसिंह चौधरी , कृष्णा बियाणी, मुकेश फु़लारी,गौरव वाळिंबे ,राज यादव, अखिलेश कुलकर्णी, कृष्णा उदावंत,आकाश कापकर, ओंकार कुलकर्णी, बालाजी चौधरी,गोविंद शर्मा,शुभम गोपिनवार, बालकिशन कोम्पलवार, धनंजय माडेवार ,आकाश कापकर,गणेश कोउलवार, शुभम ठाकूर, अवधूत कदम, श्रीधर शर्मा, गजानन देशमुख ,सौ किरण राजकुमारजी  मालू, सौ कलावती ओमप्रकाशजी काकाणी,सौ शोभा राधेश्यामजी जाजू यांनी परिश्रम घेतले घेतले. अतिशय सुनियोजित मिरवणूक काढल्याबद्दल नांदेडच्या रामभक्तांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

छाया (करणसिंह बैस ,सचिन मोहिते, धनंजय कुलकर्णी, व्यंकटेश वाकोडीकर, नरेंद्र गडप्पा, सचिन डोंगळीकर) 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी