नविन नांदेड| सामाजिक कार्यकर्ते तथा वाघाळा शहर काँग्रेस ब्लाक कमिटीचे कार्याध्यक्ष राजू लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त १ एप्रिल रोजी वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार यांच्या साठी उन्हाळ्यात बचाव करण्यासाठी टोप्या व हातगाडी व बुट पालीश करणा-या दुकानदार यांना छत्र्याचे वाटप करण्यात येणार आहे.
१ एप्रिल वाढदिवसाच्ये औचित्य साधून राजु लांडगे मित्र मंडळ यांच्या वतीने जेतवन बुद्ध विहार शंकरनगर सिडको परिसरात सकाळी १० वाजता आ.मोहनराव हंबर्डे, पक्ष पक्षप्रवकते संतोष पांडागळे, नगरसेवक तथा माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, श्रीनिवास जाधव,राजु काळे ,माजी नगरसेवक संजय इंगेवाड प्रा.अशोक मोरे, सिध्दार्थ गायकवाड, वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे.
यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या ऊपसिथीत सकाळी १० वाजता दैनंदिन वृत्तपत्र टाकणाऱ्या सिडकोच्या परिसरातील वृत्तपत्र विक्रेते व उन्हाळ्यात वृतसंकलन करणा-या पत्रकार बांधव यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या चे वाटप करण्यात येणार आहे तर हातगाडी व फुटपाथवर बुट पालीश करणा-या छत्री वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ऊपसिथीत राहण्याचे आवाहन राजु लांडगे मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.