मागील दोन वर्षाच्या कालावधीत संपुर्ण जगाने निसर्गापासून मानवी जिवन दूर गेल्याचे किंबहूना विरूध्द जिवनक्रम परिपालनाचे दुष्परिणाम संपुर्ण विश्वाने कोरोना स्वरूपात अनुभवले आहेत. या काळात आपण अनुभवले आहे की, सर्वच लोकांना कोरोना णाला नाही किंवा लक्षणे तिव्र नसून जिवित व आर्थिक हानी झाली नाही, परंतू याच काळात सर्व जगाने निसर्गाचा संहार अनुभवला आहे, ज्यात वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्राची फार मोठी हानी आपण अनुभवली आहे.
हे पुन्हा-पुन्हा घडू नये म्हणून वैषिक काळापासून सजिव सृष्टीला किंबहूना मानवी जिवसृष्टीला निरामय जिवन जगण्याचे मार्गदर्शन वैदिक ग्रंथात विशेषतः आयुर्वेदात ज्यात प्रामुख्याने पंचकर्म महत्वाचे आहे.
समदोषाः समाग्निश्चः
समधातू मलक्रियाः ।
प्रसन्नान्मेन्द्रिय मनः
स्वास्थ इति अभिधियतेः ॥
या सुत्राप्रमाणे स्वास्थ्य टिकवण्यासाठी ऋतुबदल, आहारविहारातील बदल शरीर व मानसिक आघातांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी स्वास्थ्य (शारिरीक व मानसिक) उत्तम असणे आवश्यक आहे. किंबहूना आयुर्वेदामध्ये व्यक्ती व समुहासाठी आरोग्य टिकवण्यासाठी सविस्तर माहिती दिलेली आहे.
स्वास्थ्य रक्षणासाठी शरीर शुध्दी करीता दोष साम्य राखण्यासाठी पंचकर्मादि उपक्रम व मनशुध्दी साठी धी, धैर्य आत्मादि विज्ञान अव्यंग योग यांचे पालन केल्यास ‘स्नायु निरायम’ जिवन निश्चितपणे व सक्षम जगता येते. स्वास्थ रक्षणार्थ उपक्रमामध्ये विशेषतः पंचकर्म उपक्रम वर्णन केलेले आढळते. यात स्वस्थ व्यक्ती, व्याधिग्रस्त, भविष्यात व्याधी होऊ नये यासाठी वमनादि उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. पंचकर्मात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण यात आपण सध्या वमन या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देऊ आणि भविष्यात इतरही उपक्रम कालसापेक्ष माहित करूण घेऊ. वमन या शब्दाचा अर्थ उल्दी, छर्दी, वांती, शाशीळी, र्ीेांळींळपस हे होत. यात आपण करवतो तो उपक्रम म्हणजे वमन जात प्रायः अधिक वाढलेले व्यादीकर द्रवरूप कफाचे वमनाहारे मुखावाटे बाहेर काढणे म्हणजे वमन होय.
हा विधी प्रायः प्रसंत ऋतुमध्ये केला जातो तसेच स्वस्थ व व्याधीग्रस्तासाठी वैद्याच्या सल्याने वर्षभरात कधीही केला जातो. वमन हे वसंत ऋतुपुर्वीचे क्रमाने हेमंत, शिशीर या ऋतुनिल उत्तम वातावरणात या काळात दिपावली, संक्रातिसारख्या सनामध्ये खालेला गुरू आहार तसेच भरपूर विश्रांती इत्यादीमुळे कफ दोष शरीरात वाढतो व तो वसंत ऋतुतिल उन्हामुळे बर्फ वितळल्या प्रमाणे द्रवरूप वृध्दी म्हणजेच प्रकुपित होऊन आपणास वेगवेगळे व्याधी निर्माण करतो. ज्यात सर्दि, पडसे, खोकला, दम, कफ पडणे, घसा दुखने, भूक कमी लागणे, अशक्तपणा इत्यादी स्वरूपाचे लक्षण व व्याधी निर्माण करतो. आपण या पुर्वी दोन वर्षाच्या काळात अनुभवले आहे की कोरोना बहुदा याच काळात वाढलेला आपण अनुभवला आहे. या करीता आयुर्वेद ऋतु बदलामुळे होणारे व्याधी व त्याचा प्रतिबंध किंबहूना मित कमी त्रास व्हावा यासाठी विविध उपक्रम वर्णन केलेले आहेत.
यामध्ये वसंत ऋतुतिल वाढलेल्या कफामुळे होणारे विविध आजारासाठी वमन हा उपक्रम वर्णिलेला आहे. याचे अनेक वर्षापासून निश्चितपणे सुपरिणाम तसेच असाध्य रोगावर निश्चितपणे फलदायी सुपरिणाम आम्ही सर्वांनी अनुभवले आहे. या निमित्ताने एवढेच आव्हान आहे की, आपण सर्व स्वस्थ व्यक्ती तसेच कफाचे अनेक विकार जुनाट सर्दी, पडसे, दमा, त्वचा विकार, प्रमेह, शितपित्त, कंडू, त्वचेवर गांधी योणे, स्थौल्य, अम्लपित्त, रक्तात चरबीचे प्रमाण वाढणे, स्त्रीयांचे विविध विकार, झखजड बगेश तसेच मानसविकार यात वमन उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. या निमित्ताने सर्वांना आवाहन आहे की, सर्वांनी आयुर्वेद रूग्णालयातील कक्ष क्रं.12, 18, 19 येथे संपर्क साधून वमन चिकित्सेचा उपक्रम करून घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ.वाय.आर. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.वाय.पाटील, पंचकर्म विभाग प्रमुख डॉ.एम.व्ही.भोसले यांनी केले आहे.
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयः ।
सर्वे भद्रानि पश्यन्तुः ।
मा कश्चिनदुखभागभयेत्ः ॥
या सुत्राप्रमाणे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.