नांदेड| येथील रेल्वे स्टेशन ते हिंगोली गेट परिसरात असलेल्या रेल्वे कॉलनीत बोधिवृक्ष महिला मंडळाच्या वतीने फाल्गुन पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. महिला मंडळाची ही सलग २६९ वी पौर्णिमा असून यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीताताई मुंगे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, बाभूळगावच्या सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष शांताबाई लांडगे, जेष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, ललिता सोनकांबळे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, आयोजक रमाबाई चंदनशिवे यांची उपस्थिती होती. या निमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरात बुद्धं सरणं गच्छामीचा स्वर निनादला.
रेल्वे कॉलनीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी सांस्कृतिक सभागृहात तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप, धूप आणि पुष्प पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्रिशरण पंचशील ग्रहण केल्या नंतर त्रिरत्न वंदना, गाथापठण संपन्न झाले. त्यानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने काव्यपौर्णिमा घेण्यात आली. यात अशोक हनवते, माया खिल्लारे,दयानंद खिल्लारे, प्रकाश ढवळे, शरदचंद्र हयातनगरकर,अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, थोरात बंधू, प्रज्ञाधार ढवळे, गणपत माकने, साईनाथ रहाटकर, डी. एम. गजभारे, निवृत्ती लोणे, भुजंग मुनेश्वर आदींनी सहभाग नोंदवला. ही सप्तरंगी साहित्य मंडळाची ५३ वी काव्यपौर्णिमा होती.
काव्यपौर्णिमेचे प्रास्ताविक प्रज्ञाधार ढवळे यांनी केले तर संवादसूत्र मंडळाचे राज्य उपाध्यक्ष नागोराव डोंगरे यांनी हाती घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोधिवृक्ष महिला मंडळाच्या रमाबाई चंदनशिवे, विजया वाणी, कल्याणकर डोणेराव, अशोक हनवते, शांताबाई लांडगे, यशोदा सरकटे, गयाबाई जोंधळे, सुशीला वाघमारे, शांताबाई कांबळे, नागिनबाई नरवाडे, सिंधूताई आदोडे, प्रभाकर कांबळे, भगवान हटकर यांनी परिश्रम घेतले. नागीण नरवाडे यांनी आभार मानले. यावेळी बोधिवृक्ष महिला मंडळाच्या वतीने उपस्थितांना खीरदान करण्यात आली. शेवटी सरणत्तंय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.