संतृप्त कर्मचारी व नातेवाईकांचा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मुखेड पोलिस स्टेशनवर धडकला आक्रोश मोर्चा
मुखेड, रणजित जामखेडकर| विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून राज्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या कामबंद आंदोलनातुन कर्मचाऱ्यांचे मागण्या मान्य होत नसल्याच्या नैराश्यातून व आर्थिक संकटामुळे राज्यातील ११४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
मुखेड आगारातील चालक पदावर असलेले गंगाधर मारोती येवतीकर यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना दि .२१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली आहे. मुखेड तालुक्यातील येवती येथील गंगाधर मारोती येवतीकर वय ४८ वर्ष हे दि .२१ मार्च रोजी मुखेड शहरानजीक असलेल्या कंधार फाटा येथे त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी ५.३० च्या सुमारास विषप्राशन केलेल्या अवस्थेत नातेवाईकांना दिसले नातेवाईकांनी धावपळ करून त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल केले होते.
सायंकाळी ६.१५ वाजता दाखल करण्यात आले मात्र उपचार चालू करण्या आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे . त्यांच्या प्रश्चात पत्नी , मुलगा, आहे तर भाऊ व वडील गुजरातला असल्याची माहिती आहे. आज २२ मार्च रोजी सकाळी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसह सतृप्त नातेवाईकांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी मुखेड पोलिस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी राज्यभरात एस.टी. कर्मचाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून बेमुदत संप चालू आहे परंतु महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने राज्यातील तब्बल ११४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्त्या धोरणा विरोधात एस.टी. कर्मचाऱ्यांतून तिव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात येत आहे.