एका कालखंडाचा सामाजिक भवताल 'बोऱ्याची गाठ' कादंबरीतून अधोरेखित -NNL

कौतिकराव ठाले-पाटील यांचे प्रतिपादन 


नांदेड।
परंपरेने चालत आलेले अनेक शब्द महेश मोरे यांच्या 'बोऱ्याची गाठ' या कादंबरीत आहेत. त्यातील हे शब्द या साहित्यकृतीला जिवंतपणा आणतात. या कादंबरीतून एका कालखंडाचा सामाजिक भवताल महेश मोरे यांनी अधोरेखित केला आहे, असे प्रतिपादन 'बोऱ्याची गाठ' या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष  कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले.
        
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहातील रंगशारदा सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे होते. या कादंबरीचे प्रकाशन प्राचार्य डॉ. अशोक गवते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी, प्रा. डॉ. शंकर विभुते, प्रभाकर कानडखेडकर, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साहित्यिक डॉ शंकर विभुते म्हणाले की, समकालीन वर्तमान ललित लेखनातून मांडणी करणे अतिशय कठीण बाब आहे. हा काळ व्यामिश्र गुंतागुंतीचा अनुभवाचा आहे. या अनुभवाचा सुंदर अक्षरशिल्प म्हणजे महेश मोरे लिखित बोऱ्याची गाठ ही कादंबरी होय. 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी यांनी कादंबरीतील भाषाशैलीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, मायबोली ही मराठी भाषेची जीवनवाहिनी आहे. अशा मायबोलीला पुनर्जीवित करण्याचं काम महेश मोरे यांनी  बोऱ्याची गाठ या कादंबरीतून केले आहे. तर ज्यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन झाले ते साहित्यिक प्राचार्य. डॉ.अशोक गवते यांनी 'महेश मोरे आमच्या संस्थेत नोकरी करतात, ही आमच्यासाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे' असे ते म्हणाले. कार्यक्रमात आपल्या कादंबरीचे मनोगत व्यक्त करताना प्रा.महेश मोरे यांनी मी आणि माझं लेखन यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पृथ्वीराज तौर यांनी तर आभार प्रा.स्वाती कान्हेगावकर यांनी मानले.

कार्यक्रमास डॉ.हंसराज वैद्य, शंतनु डोईफोडे, डॉ.पी.विठ्ठल, दिगंबर कदम,के. एस. अतकरे, अँड .भोपी, प्रा. कल्पना जाधव, शिवाजी हंबर्डे, व्यंकटेश सोळंके, शिवाजी आंबूलगेकर, शंकर राठोड , रोहिणी पांडे, पुष्पा मोरे, बापू दासरी, विजय बंडेवार, गजानन पिंपरखेडे, माधव जाधव , प्रा. पी.एम. नरवाडे, वसंत वानखडे ,राम जाधव,शिवा कांबळे, अमृत तेलंग, मिरेवाड, डॉ.अमर शिंदे, कुमार अभंगे,प्र. श्री जाधव, भगवान काळे, आनंद तिडके  यांच्यासह बहुसंख्य साहित्यिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी