नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘मुकनायक मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक लेखन’ आणि ‘भारतीय पत्रकारिता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या तीन विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठातून सुमारे ८६ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे जाहीर करण्यात आला. त्यामध्ये विशाल रामराव राठोड (प्रथम), ज्योती रमेश सपाटे (व्दितीय), राजेश अंकुश पांचाळ (तृतीय), आणि प्रणिता गंगाधर पटवेकर व सुजीत श्रीकृष्ण साळुंके या दोघांना (उत्तेजनार्थ) बक्षिसे जाहीर करण्यात आले.
निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. अविनाश कदम व डॉ. प्रमोद लोणारकर यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना लवकरच एका विशेष समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्तें बक्षीसाचे धनादेश प्रदान करण्यात येतील. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी कळवले आहे.
‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.१२ मार्च रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे, लातूर येथील उपकेंद्राचे संचालक डॉ. राजेश शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुढे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, उप वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुतटे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, प्रा. डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलाश यादव, राजु द्याडे, श्याम डाकोरे, अजय काटे, शिवाजी चांदणे, संतोष हंबर्डे, रामदास खोकले, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.