मुख्य कार्यक्रम पुतळ्याचे अनावरण समारोह ,समरणिका व दिनदर्शिका प्रकाशन व कै डी.बी.पाटील होटाळकर बालक उद्यान भूमीपुजन दि.१३ मार्च रोजी नायगांव येथील कै डी.बी पाटील कॅम्पस, मिलेनियम इंग्लिश स्कुलच्या भव्य मैदानावर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रारंभी श्री १०८ महंत यदुबन गुरू गंभीरबन महाराज कोलंबीकर,श्री सद्गुरू गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर ,गुरुवर्य गुरूबाबा महाराज औसेकर नाथ संस्थान औसा,ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष विठलं रुक्मिणी मंदिर पंढरपूर,या चार ही गुरुवर्य यांची धान्य तुला कै.डी.बी.पाटील होटाळकर यांच्या पत्नी सिंधुताई च्या मार्गदर्शनाखाली होटाळकर परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे.
पुतळा अनावरण व अन्य कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नांदेड चे खा.प्रताप पा. चिखलीकर राहणार आहेत तर उदघाटक म्हणून माजी खा.मंत्री भास्कर पा. खतगांवकर,व भूमिपूजन उदघाटक माजी मंत्री आ.रणजितसिंह मोहिते पाटील दिनदर्शिका व समरनिका प्रकाशन माजी केंद्रीय राज्य मंत्री सुर्यकांता ताई पाटील ,व माजी मंत्री डाँ.माधवराव किन्हाळकर,यांच्या हस्ते होणार आहे विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री डी.पी.सावन्त साहेब ,खा हेमंत पाटील,आ.राणा जगजितसिंह राणा,या सह नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्षीय आजी माजी आमदार व जि.प.अध्यक्ष,सभापती,महापौर, नगराध्यक्ष,अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
डी.बी पाटील यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १५ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी ४.३० ते ७.३० वाजता श्री सदगुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.या सर्व कार्यक्रमाचा लाभ नायगाव तालुक्यातील व शेजारच्या तालुक्यातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी शिक्षण सभापती शिवराज पा. होटाळकर व आर्टिकेट दत्तात्रय पा. पवार होटाळकर यानी एका पत्रकाद्वारे केले आहे.