कंधार, सचिन मोरे| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा.शरदचंद्र पवार यांचे राज्याच्या विकासाचे विचार व गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार प्रत्येक घरात पोहचावेत या उदात हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमा अंतर्गत त्यांच्या गावी पाणभोसी ता.कंधार जि.नांदेड येथे गावकर्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगदान पाहता एक तास राष्ट्रवादी या उपक्रमा अंतर्गत जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी पानभोसी ता.कंधार येथे गावकर्यांशी संवाद साधून खा.शरदचंद्रजी पवार यांचे विचार समाजासाठी किती प्रेरणादायी आहेत याचे महत्व पटवून सांगितले. तसेच प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी राबविण्यात आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जिल्हा उपाध्यक्ष दिगांबरराव पाटील पेठकर, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव अंगद केंद्रे, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश सचिव मोहनराव भोसीकर, परशुराम केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच शिवकुमार भोसीकर यांनी केले होते. यावेळी सौ.राजश्रीताई भोसीकर, भुजंगराव कारामुंगे, सरपंच बालाप्रसाद मानसपुरे, प्रभुअप्पा भातमोडे, बालाजी नाईकवाडे, माणिकराव भोसीकर, व्यंकटराव भातमोडे, देवराव मामा, किशनराव लुंगारे, शाम पाटील, माजी सरपंच सय्यद तजोद्दीन, ग्रा.प.सदस्य शेख रहिम, राजू गौंड, भानुदास वाघमारे, शेख रूस्तूम, माजी सरपंच नारायणराव डोम, शिवाजीराव नाईकवाडे, शेषेराव लुंगारे, विठ्ठलवार पवार, आनंदराव भोसीकर, शिवदास नाईकवाडे आदी जणांची उपस्थिती होती.