नायगाव, दिगंबर मुदखेडे| नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथे दि.22/03/2022 रोजी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच तालुकास्तरीय गुरु गौरव पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचा सत्कार सोहळा शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात संपन्न झाला.
यावेळी पंचायत समिती नायगाव चे गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे, बरबडा केंद्राचे केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, बरबडा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक सायबु गुंटे, पाटोदा शाळेचे मुख्याध्यापक शिंगेवाडे सर याप्रसंगी पाटोदा नगरीचे भूमिपुत्र तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी आलेवाड आणि पाटोदा शाळेचे शिक्षक वृंद आमलापुरे सर, मुखेडकर सर, पाटील सर, भद्रे सर, सौ.कांबळे मॅडम, सौ. गिरे मॅडम उपस्थित होते.
तसेच जिल्हास्तरीय गुरू गौरव प्राप्त शिक्षक श्री. शिवाजी शेवाळे, तालुकास्तरीय गुरु गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.किशन पंचलिंग, श्री. दत्ता अंबुलगे, श्री. दयानंद खिंडे, सौ.राजश्री भैराट मॅडम व सौ. सुषमा पोलशेटवार मॅडम यांचा सत्कार शिक्षणाधिकारी सौ. बिरगे मॅडम व नायगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे सर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील ख्यातनाम व्याख्याते श्री.आनराये सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पाटोदा गावचे सरपंच,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री माधव शिंगेवाड सर, सूत्रसंचालन उत्कृष्ट शिक्षक आणि ख्यातनाम शिव कीर्तनकार श्री चंद्रकांत आमलापुरे सर तर आभार प्रदर्शन श्री मुखेडकर सर यांनी केले.