किनवट, माधव सूर्यवंशी| किनवट तालुक्यात निर्माणाधिन असलेल्या बहुचर्चित अशा राष्ट्रीय महामार्ग १६१ ए संदर्भात मागील काळात अनेक उद्भवलेल्या तक्रारीच्या अणुषंगाने आज सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या तथा माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाव्दारे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेनेचे व्यंकट भंडारवार व सामाजिक कार्यकर्ते संजिव बॅनर्जी यांच्या निवेदन व तक्रारीच्या अणुषंगाने आज राष्ट्रीय महामार्ग संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले सुरवातील व्यंकट भंडरवार यांनी आपले म्हणणे मांडले असुन त्यात शहरातील मार्ग हा ३० मिटर रुंदव्हावा अन्यथा हो करण्यात येऊ नये असे त्यांनी मत व्यक्त केले तर रस्त्याच्या उजव्या बाजुने जास्त शासकीय जागा असुन त्या व्यतीरिक्त बाकी सर्व अतिक्रमण आहे ते काढल्यास रस्त्या करिता जागा उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले तर माजी आमदार प्रदीप नाईक यांनी अभियंता सावत्रे यांना कोठारी ते श्री अयप्पा स्वामी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे स्वरुप काय आहे असा प्रश्न विचारला तर रस्त्याचे स्वरुप सांगण्यात यावे असे सांगितले.
त्यात श्री सावत्रे यांनी सांगितले आहे कि, कोठारी ते बाळासाहेब ठाकरे चौका पर्यंत आम्ही २७ मिटर रोड करत आहोत. त्यांनतर रेल्वे ओव्हर ब्रिजचा प्रश्न प्रलंबित आहे त्यानंतर पेट्रोल पंप ते अशोक स्तंभ असा हि २७ मिटर रोड होत आहे तर अशोक स्तंभ ते जिजामाता चौक १८ मिटर रोड होणार आहे त्यानंतर जिजामाता चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकड चौक असा २७ मिटर रोड होणार असुन या मार्गावर आम्ही असलेले चौकातील अतिक्रमण व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथिल वळन मार्ग काढण्याकरिता काही मालमत्ता प्रशासनाच्या मदतीने काढणार आहोत तर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते अयप्पा स्वामी मार्ग देखिल प्रशस्त होणार आहे. तर यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट शहरात सर्वत्र एकच न्याय देऊन मार्ग ३० मिटर रुंद करा अन्यथा करु नाका अशा सुचना दिल्या.
त्यावेळी एक्झिकेटिव्ह इंजिनिअर सावत्रे यांनी असे सांगितले कि वन्यजिव संदर्भात इको झोनच्या संदर्भात मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत १८ मिटर मार्ग बनवण्याकरिता परवानगी देण्यात आल्याचा ठराव सम्मत करण्यात आला आहे त्या नुसार आम्हाला काम करावे लागणार आहे. तर यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी पुढाकार घेऊन मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे पुर्नविचार करण्याकरिता प्रस्ताव आपल्या जिल्ह्यातुन पाठवु शकतो व येथिल लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते, नागरीकांचे म्हणण्यानुसार निर्णय घेतला जाऊ शकते असा प्रस्ताव दिला परंतु तो पर्यंत काम करु नका जरी करत असाल तर रस्त्याच्या दोन्ही बाजेने जागा सोडुन करुन नका उपलब्ध जागा १०० टक्के वापरुन नालीचे बांधकाम करुन काम करा अन्यथा काम करु नका से माजी आमदार प्रदिप नाईक यांनी सांगितले. त्या नंतर आगामी काळात सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे यवतमाळ च्या जिल्हाधिकारी सोबत बैठक घेऊन सदर मार्गाचा तोडगा काढण्याकरिता पुढाकार घेणार आहेत.
या महामार्गाच्या तांत्रिक अडचणी अशा आहेत कि, हा मार्ग जर ३० मिटर रुंद करण्यात आला नाही तर गोकुंदा येथिल रेल्वे ओव्हर ब्रिज चे काम करता येणार नाही व संबधित कंत्राटदाराला ते काम करायचे नाही त्यामुळे तो उर्वरीत शहर व गोकुंदा मध्ये १८ मिटर रोड निर्मान करुन मोकळा होण्याच्या प्रयत्नात आहे ज्यामुळे आगामी काळात नागरीकांना अतोनात त्रास होणार आहे असे आम्ही कदापी होऊ देणार नाही वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरु व केसेस अंगावर घेऊ असे यावेळी माजी आमदार प्रदिप नाईक यांनी बोलतांना सांगितले तर किनवट तालुक्यातील ग्रामिण भागात जोड रस्त्यांना सर्विस रोड न बांधल्याने आमच्या नागरीकांचे जिव गेले त्याला जबाबदार कोण ? हा हि प्रश्न उपस्थित केला त्यावर अभियंता सावत्रे यांनी सांगितले कि, ग्रामिण भागात जोड रस्ते आम्ही करुन देणार आहोत व उंची सुध्द्दा समतल करणार आहोत त्यावर नाईक यांनी सुचना केल्या कि ते काम जास्त दिवस प्रलंबित ठेऊ नका व ते करत पुढे जा या सोबतच राजगड येथिल घाट, सारखणी, वाई, बोधडी, जलधारा, चिखली परिसरातील मार्ग व पुला संदर्भात देखिल माजी आमदार नाईक यांनी अभियंत्यांना धारेवर धरले.
एकंदरीत आजच्या बैठकीत उपस्थित सर्व पुढारी, नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांचा एकच सुर होता तो म्हणजे सदर मार्ग हा शहरातुन ३० मिटर रुंदव्हावा, मध्ये डिव्हायडर व्हावे, बाजुने फुटपाथ निर्माण करण्यात यावे याकरिता संर्वानी संघर्षाची तयारी दर्शवली आहे आगामी काळात यामुळे मोठा लढा उभा राहणार आहे. तर आजच्या बैठकीला तहसिलदार डॉ मृणाल पाटील, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, रा.कॉचे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, गटनेते झहिरोद्दीन खान, त्रिभुवनसिंग ठाकुर, वैजनाथ करपुडे पाटील, प्रविण म्याकलवार, अनिल पाटील, श्रीनिवास नेम्मानिवार, राहुल नाईक, डॉ रोहिदास जाधव, कचरु जोशी, रामेश्वर पंड्या, रमन ओद्दीवार, नितिन चाडावार, सुशिल जन्नावार, सुधिर सातुरवार, पत्रकार प्रदिप वाकोडीकर, गोकुळ भवरे, शकिल बडगुजर, नौशाद खान, नाना भालेराव, अमदिप कदम, रमेश राठोड, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड, राष्ट्रीय महामार्ग अथोरिटी नांदेड, संबधित कंत्राटदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.