हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व शांतीलाल श्रीश्रीमाळ यांची नात कु. सेजल श्रीश्रीमाळ हिने आपले डॉक्टर बनायचे स्वप्न पूर्ण केले. नांदेड जिल्हयातील श्वेतांबरी जैन समाजातून डॉक्टर होणारी हि पहिली मुलगी ठरली आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केले जात आहे.
स्वत:च्या जिद्दी व चिकाटीने कु. सेजल श्रीश्रीमाळ हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. शेजलने नागार्जुन पब्लिक स्कुल नांदेड येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले तर सहयोग ज्युनियर कॉलेज नांदेड महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तिने एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी महात्मा गांधी मेडिकल कॉलेज औरंगाबाद महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.
त्यानंतर शेजलने २०२२ मध्ये एमबीबीएस पदवी संपादन केली. तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण झाल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा आनंद झाला आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल समाज बांधवांसह, कुटुंबीय व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे. कु. सेजल श्रीश्रीमाळ केस्ट्रॉलचे कंपनीचे ५ जिल्ह्याचे वितरक मनोजकुमार श्रीश्रीमाळ यांची कन्या होय.