नांदेड| श्री काशी अन्नपुर्णा वासवी, आर्य वैश्य वृध्दाश्रम व नित्यान्नसत्रम अंतर्गत कै.बालकिष्टया मेमोरियल एज्युकेशन फंड या संस्थेकडून महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून आर्य वैश्य समाजातील उच्च शिक्षण घेणार्या 37 गुणवंत विद्यार्थ्यांना 15 लाख 89 हजार 400 रुपयांचे धनादेश शेैक्षणिक अर्थसहाय्य म्हणून देण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड महानगरचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुकावार तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव दत्तात्रय पारसेवार कोषाध्यक्ष बालाजी येरावार, सहसचिव दिलीप दमकोंडवार, सह कोषाध्यक्ष सुरेश निलावार, संघटक प्रमुख सचिन काशेटवार, प्रसिध्दी प्रमुख संजय काचावार, रितेश भास्करवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य साईनाथ मेडेवाड, गजानन चिद्रावार यांची उपस्थिती होती.
उपस्थितांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांंना धनादेशचे वाटप करण्यात आले. आर्य वैश्य महासभेकडून उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना विना व्याज आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम विद्यार्थ्यांना नौकरी लागल्यानंतर परत करावी लागते. तीच रक्कम भविष्यात उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना दिली जाते.