हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना संजय काईतवाड व गिरी यांचे निवेदन
हिमायतनगर| तालुक्यातील वरील सर्व गावे रस्त्याचे अतिशय दूर अवस्ता झाली श्री क्षेत्र बोरगडी येथील जाग्रत हनमंतरायाचे देवस्थान असून, हनुमान जयंतीनिमित्त हजारो भाविक दर्शनाला येतात या सर्व भाविकांसह या भागातील ग्रामस्थांची खड्डामय रस्त्यामुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी हिगोली लोकसभा मतदार संघातील ता.हिमायतनगर येथील मोजे आंदेगाव टेंभी, बोरगडी, बोरगडी तांडा 1 ब 2 धानोरा वारंगटाकळी पर्यंत पतंप्रधान ग्रामसडक योजनेतुन तात्काळ मंजुरी देऊन अडचण सोडवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे संजय काईतवाड व गिरी यांनी केली आहे.
या भागातील सर्व नागरिकांचा व दर्शनाला येनाऱ्या भाविकांना दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यामुळे गाव गाठणे आणि दर्शनाला जाणे जीवघेणे ठरते आहे. मागील १० वर्षांपूर्वी रस्त्याचे काम झाले होते. तेंव्हापासून या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळ दळणवळणचा प्रश्न निर्माण झाला आहे. हि बाबा लक्षात घेऊन खासदार महोदयांनी तात्काळ रस्ता मंजूर करून द्यावा. अशी विनंती संजय काईतवाड बोरगडी कर, सौ. आमृपाला उत्तम राऊत सरपंच अंदेगाव, सौ. चंद्रभागा पुंडलिक काईतवाड सरपंच बोरगडी, सौ. प्रभावती गणेशराव शिंदे सरपंच धानोरा (ज), सौ. मायावती दयाळगिर गिरी सरपंच वारंगटाकळी यांनी केली आहे.