राज्य सरकारच्या नाकामी कृत्या विरोधात भाजपने केले नोटिसीचे दहन -NNL


नांदेड।
 फोन टँपिंग प्रकरणी मा. श्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र यांना महाराष्ट्र शासन व मुंबई पोलीस यांच्या सूड भावनेच्या बुद्धीने यांच्यावर बजावलेल्या नोटीस चा जाहीर निषेध करण्यासाठी आज दि. 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या नाकामी कृत्या विरोधात नोटिसीचे दहन करण्यात आले व आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

 देवेंद्र फडणवीस अंगार है बाकी सब भंगार है, देवेंद्र फडणीस संघर्ष करो हम तुम्हारे साथ है हम से जो टकरायेगा मिटटी मे मिल जायेगां आशा घोषनांनी परिसर दणाणून गेला होता. 

यावेळेस संचलन जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण अँङ. दिलीप ठाकूर जिल्हाध्यक्ष  प्रवीण साले,  दिलीप कंदकुर्ते, बाळू खोमणे, चैतन्य बापु देशमुख, अजय सिंह बिसेन, दिपकसिंह  रावत,अरविंद भारतीय,  विजय गंभीरे,अशोक दिलीप ठाकुर,व्यंकट मोकले, शितल खंडील, अनिलसिंह  हजारी, प्रभु कपाटे, व्यंकटेश जिन्दम, व्यकटेश साठे,  दिलीपसिंघ सोढ़ी,वैशाली देशमुख,विनायक सगर,कुणाल गजभारे,हरभजन सिंह आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी